एक्स्प्लोर

GST Collection : नोव्हेंबरमध्ये जीएसटीतून 1.70 लाख कोटी सरकारच्या तिजोरीत जमा, आकडेवारी समोर 

November GST Collection: जीएसटी परिषदेनं नोव्हेंबर महिन्यात वस्तू आणि सेवा करातून सरकारच्या तिजोरीत किती कोटी रुपये जमा झाले याची आकडेवारी समोर आली आहे.

November GST Collection नवी दिल्ली : नोव्हेंबर महिन्यात भारत सरकारच्या तिजोरीत वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून 1.70 लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. नोव्हेंबर 2024 मध्ये जीएसटी कलेक्शन 1 .69 लाख कोटी रुपये होते.  गतवर्षीच्या नोव्हेंबरच्या तुलनेत यंदाच्या नोव्हेंबरमध्ये जीएसटी कलेक्शन वाढलं आहे. मात्र, ऑक्टोबर 2025 च्या तुलनेत जीएसटी कलेक्शन घटलं आहे.  

केंद्र सरकारच्या सूचनेनंतर जीएसटी परिषदेनं 22 सप्टेंबरपासून वस्तू आणि सेवा कराच्या स्लॅबमध्ये बदल केले होते. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात दसरा आणि दिवाळी सारखे सण होते. त्या काळात लोकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्यानं सरकारला जीएसटीच्या रुपात मोठी रक्कम मिळाली होती. ऑक्टोबरमध्ये सरकारला जीएसटीतून 1.96 लाख कोटी रुपये मिळाले होते. नोव्हेंबर महिन्यात खरेदी कमी झाल्यानं वस्तू आणि सेवा करातून मिळणारी रक्कम देखील कमी झाली आहे.  

नोव्हेंबरमध्ये सकल देशांतर्गत उत्पन्न  2.3 टक्क्यांनी कमी होत  124299 कोटी रुपये झालं आहे. जीएसटी दरातील कपातीनंतर हे बदल झाले आहेत. सीजीएसटी 34843 कोटी रुपये, राज्याचा जीएसटी 42522 कोटी आणि इंटिग्रेटेड जीएसटी 46934 कोटी रुपये जमा झाला आहे. 

आयातीमुळं करात वाढ

नोव्हेंबर महिन्यात आयातीतून उत्पन्न 10.2 टक्क्यांनी वाढून 45976 कोटी रुपये झालं आहे. त्यामुळं एकूण सकल जीएसटी महसूल 170276 कोटी रुपये झाला आहे. जो नोव्हेंबर 2024 च्या तुलनेत 0.7 टक्के अधिक आहे. रिफंडचा विचार केला तर देशांतर्गत रिफंड 8741 कोटी रुपये आहे. तर, निर्यातीचा विचार केला तर जीएसटी रिफंड 9464 कोटी कोटी रुपये आहे.  

दोन्ही एकत्र केल्यास नोव्हेंबरमधील जीएसटी रिफंड 18196 कोटी रुपये आहे. रिफंड समायोजित केल्यानंतर देशांतर्गत जीएसटी महसूल 1.5 टक्क्यांनी घटून 115558 कोटी रुपये होतो. निर्यात आणि आयातीमधील नेट कलेक्शन 11.6 टक्क्यांनी वाढलं आहे.  ते 36521 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. एप्रिल ते नोव्हेंबर 2025 मधील नेट जीएसटी 7.3 टक्क्यांनी वाढून 12.79 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.  

सेस कलेक्शनमध्ये घसरण

नोव्हेंबर 2025 मध्ये कॉम्पेनसेशन सेस कलेक्शनमध्ये घसरण झाली आहे. देशांतर्गत सेस कलेक्शन गेल्य वर्षीच्या तुलनेत या महिन्यात 12398 कोटी रुपयांवरुन कमी होऊन 4737 कोटी रुपये झालं आहे. नेट सेस उत्पन्न कमी होऊन 4006 कोटी रुपये राहिलं आहे.  

जीएसटी कलेक्शनमध्ये कोणतं राज्य आघाडीवर?

नोव्हेंबर 2025 मध्ये जीएसटी कलेक्शनमध्ये राज्यवार विश्लेषण पाहिलं असता राज्यांची कामगिरी संमिश्र राहिली. केरळ राज्य सकारात्मक ग्रोथ चार्टमध्ये सर्वात पुढं राहिलं. केरळमध्ये एसजीएसटीमध्ये 7 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. महाराष्ट्रात एसजीएसटीत 3 टक्क्यांची वाढ दिसून आली. बिहारमध्ये 1 टक्क्यांची वाढ झाली आहे.  

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

गोवा रिसॉर्टची किंमत 982 कोटी रुपये, कंपनीच्या 485 कोटी रुपयांच्या बाजार मूल्याच्या जवळजवळ दुप्पट
गोवा रिसॉर्टची किंमत 982 कोटी रुपये, कंपनीच्या 485 कोटी रुपयांच्या बाजार मूल्याच्या जवळजवळ दुप्पट
RBI ची मोठी कारवाई! 'या' बँकेवर 6 महिन्यांची बंदी, पैसे काढण्यावरही मर्यादा, तुमचे खाते कोणत्या बँकेत?
RBI ची मोठी कारवाई! 'या' बँकेवर 6 महिन्यांची बंदी, पैसे काढण्यावरही मर्यादा, तुमचे खाते कोणत्या बँकेत?
'या' फार्मा कंपनीचा शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकाजवळ; निधी उभारणीबाबत बोर्डाची बैठक!
'या' फार्मा कंपनीचा शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकाजवळ; निधी उभारणीबाबत बोर्डाची बैठक!
आपण आर्थिकदृष्ट्या सुसंगत आहात का? नवीन नातेसंबंधातील 'ग्रीन फ्लॅग' ओळखा
आपण आर्थिकदृष्ट्या सुसंगत आहात का? नवीन नातेसंबंधातील 'ग्रीन फ्लॅग' ओळखा

व्हिडीओ

Maharashtra Operation Tiger : ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या गळाला? कोण कुठे आहे? आत्ताची मोठी अपडेट
Raju Waghmare On Operation Tiger Zero Hour : २०२९ पर्यंत उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपलेला असेल? | Zero Hour
Goras Bhandar FDA Action Wardha: तुकाराम मुंढेंच्या कारवाईला गोरस भंडारचे हायकोर्टात आव्हान
Sudhir Mungantiwar on Opration Tiger : ठाकरेंचे खासदार देशहितासाठी सोबत येत असतील तर स्वागतच - सुधीर मुनगंटीवार
Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena : ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दिशेने, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार, सूत्रांची माहिती
ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दिशेने, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार, सूत्रांची माहिती
अभिनेत्री संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर, 3000 रुपये घेतलेले; नातेवाईकांचे आरोप, तोच मुलीला त्रास द्यायचा
अभिनेत्री संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर, 3000 रुपये घेतलेले; नातेवाईकांचे आरोप, तोच मुलीला त्रास द्यायचा
मंडोळ्या बांधून नटली नवरीबाई; सुप्रिया सुळेंच्या घरी लगीनघाई, वडिलांची लाडाची लेक लवकरच मांडवात
मंडोळ्या बांधून नटली नवरीबाई; सुप्रिया सुळेंच्या घरी लगीनघाई, वडिलांची लाडाची लेक लवकरच मांडवात
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी  733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी  733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचं रक्त काढून राज्यातील इतर विभागप्रमुखांना द्या, म्हणजे...; माजी मंत्र्यांचं मुख्य सचिवांना पत्र
तुकाराम मुंढेंचं रक्त काढून राज्यातील इतर विभागप्रमुखांना द्या, म्हणजे...; माजी मंत्र्यांचं मुख्य सचिवांना पत्र
कंगना रणौतचा नवा सिनेमा, 26/11 दहशतवादी हल्ल्याची स्टोरी पुन्हा मोठ्या पडद्यावर; 'भारत भाग्य विधाता' का पाहावा?
कंगना रणौतचा नवा सिनेमा, 26/11 दहशतवादी हल्ल्याची स्टोरी पुन्हा मोठ्या पडद्यावर; 'भारत भाग्य विधाता' का पाहावा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2026 | मंगळवार
आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच चटई अंथरुन रुग्णांवर उपचार; सलाईन नाही अब्रू टांगली, रोहित पवारांकडून फोटो शेअर
आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच चटई अंथरुन रुग्णांवर उपचार; सलाईन नाही अब्रू टांगली, रोहित पवारांकडून फोटो शेअर
Embed widget