Gold Silver Rate Today : गेल्या काही दिवसात आखाती देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम हा संपूर्ण जगाच्या विविध क्षेत्रात पडत आहे. तसा तो जळगावमधील सुवर्णनगरीवर ही पडताना दिसत आहे. डॉलर इंडेक्स दिवसागणिक वाढत असताना रुपयाची नीचांकी पातळीवरील घसरणमुळे सोन्याच्या दरात घसरण होत असल्याच पाहायला मिळत आहे. काल (20 मार्च) जळगाव सुवर्ण नगरीमध्ये सोन्याचे दर (Gold Rate)जीएसटी (GST) शिवाय 1,48, 000 असतांना आज त्यामध्ये चार हजार रुपयांची घसरण होऊन हेच दर 1,44,000 वर खाली आले आहेत. तर चांदीच्या दरात(Silver Rate) देखील सहा हजार रुपयांची घसरण होऊन चांदीचे दर हे 2,36,000 वरून 2,30,000 इतके खाली आले आहेत. युद्धाची तीव्रता अशीच कायम राहिली तर सोने चांदीच्या दरात अजूनही घसरण होण्याचा अंदाज सुवर्ण व्यासायिक व्यक्त करत आहेत.
Gold Silver Rate : आगामीकाळातअसेअसतील सोन्याचा दर?
बाजारात मंदीचा दबाव कायम राहण्याची शक्यता वर्तवत, एलकेपी सिक्युरिटीजचे संशोधन उपाध्यक्ष (कमोडिटी आणि करन्सी) जतीन त्रिवेदी म्हणाले, "महत्त्वाचे मॅक्रो संकेत अजूनही प्रतिकूल असल्याने बाजारातील वातावरण कमकुवत आहे. व्याजदर वाढलेले राहण्याची शक्यता आहे, तर सध्याच्या भू-राजकीय तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्याने महागाईची चिंता वाढत आहे आणि सोन्याच्या वाढीला मर्यादा येत आहेत. एकूणच, सोने अस्थिर आणि कमजोर राहण्याची शक्यता आहे."नजीकच्या काळात सोन्याची ट्रेडिंग रेंज ₹1,40,000 ते ₹1,47,000 दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
एसएस वेल्थस्ट्रीटच्या सुगंधा सचदेवा म्हणाल्या की, आज एमसीएक्सवर सोन्याच्या किमतींना प्रति 10 ग्रॅम ₹1,70,000 जवळ तीव्र प्रतिकाराचा सामना करावा लागत आहे, तर ₹1,65,000 हा नजीकच्या काळासाठी एक महत्त्वाचा पिव्होट आहे. जोपर्यंत किमती या पातळीच्या खाली राहतील, तोपर्यंत बाजारात सुधारणा होण्याची शक्यता आहे आणि किमती प्रति 10 ग्रॅम ₹1,35,000 ते ₹1,27,000 पर्यंत घसरू शकतात.
Israel Iran War : युद्धाच्या पार्श्वभूमीवर डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण
अमेरिका इस्त्रायल आणि इराणमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली मोठी घसरण, त्याचबरोबर डॉलर इंडेक्स मजबूत झाल्याचा परिणाम म्हणून, अनेक देशात सोन्या चांदीमधील गुंतवणूक ही अन्य ठिकाणी वळवली जात असल्याचा हा परिणाम मानला जात आहे. युद्धाची तीव्रता अजून वाढली तर अजूनही सोन्याच्या आणि चांदीच्या घसरण होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
