Gold Silver Rates Today: देशात सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरणीचा ट्रेंड कायम आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच दोन दिवसांत मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर चांदीच्या दरात तब्बल 8000 रुपयांहून अधिक घसरण झाली आहे. मंगळवारीही बाजार उघडताच चांदीचा भाव खाली आला. या ताज्या घसरणीनंतर चांदी तिच्या सर्वाधिक दर पातळीपेक्षा तब्बल 2.14 लाख रुपयांनी स्वस्त झाली आहे. (Gold Silver Rates) त्यामुळे सोने चांदी घेऊ इच्छीणाऱ्या ग्राहकांसाठी ही सुवर्णसंधी आहे. 

Continues below advertisement

चांदीच्या दरात पुन्हा मोठी घसरण

MCX वर चांदी आज ओपनिंगलाच घसरून 2,47,800 रुपये प्रति किलोवर आली. गेल्या दोन दिवसांत चांदीच्या किमतीत झपाट्याने घट झाली आहे. 1 मे रोजी चांदीचा दर 2,50,937 रुपये प्रति किलो होता, जो आता 8030 रुपयांनी कमी झाला आहे. चांदीच्या सर्वाधिक दराशी तुलना केली, तर जानेवारी महिन्यात  चांदी 4,57,328 रुपये प्रति किलो एवढ्या उच्चांकावर पोहोचली होती. मात्र त्यानंतर सतत घसरण होत सध्या चांदीचा दर या उच्चांकापेक्षा 2,14,421 रुपयांनी खाली आला आहे.

सोने थोडं सावरलं, पण अजूनही चढउतार कायम

सोनेही मंगळवारी MCX वर सुरुवातीला घसरलं, मात्र नंतर किंचित वाढ दिसली. तरीही गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात 2124 रुपयांची घसरण झाली आहे. सध्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,47,800 रुपयांवर आला आहे. याआधी सोनं 1,51,352 रूपयांवर होतं . MCX वरील आकडेवारीनुसार जानेवारीत सोन्याचा  सर्वाधिक दर 2,02,984 रुपये होता. त्या तुलनेत सध्या 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 53,756 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

Continues below advertisement

सोने चांदी आजचे दर

सोने - 1 लाख 47 हजार 800 चांदी - 2 लाख 45000   कालचे दर  सोने -  1 लाख 48 हजार 500  चांदी - 2 लाख 48000

देशांतर्गत बाजारातही दर कमी

फक्त MCX वरच नाही, तर देशांतर्गत बाजारातही सोने-चांदीचे दर कमी झाले आहेत. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या माहितीनुसार, गेल्या आठवड्याच्या शेवटी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,50,263 रुपये होता, जो सोमवारी घसरून 1,48,100 रुपयांवर स्थिरावला. चांदीच्या किमतीतही किरकोळ घट झाली असून ती 2,40,331 रुपयांवरून 2,40,120 रुपयांवर आली आहे.

खरेदी करताना हे लक्षात ठेवा

IBJA चे दर देशभरात समान असले तरी सराफा दुकानातून सोने-चांदी खरेदी करताना त्यावर GST आणि मेकिंग चार्जेस लागू होतात. त्यामुळे प्रत्यक्ष खरेदी करताना किंमत अधिक मोजावी लागू शकते.