Gold Silver Rates Today: सोने -चांदी आवाक्याबाहेरच! पुन्हा दर वाढले, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? भाववाढीची कारणे काय?
Gold Silver Rates: सर्वसामान्यांना सोने खरेदी (Gold Price) विषयी प्रचंड धाकधूक वाढली होती. सोन्यात पैसे गुंतवावे की नाही? याबाबत अजूनही संभ्रमावस्थेत नागरिक आहेत.

Gold Silver Rates Today: गेल्या दोन दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. वर्षभराहून अधिक कालावधीत सोन्या चांदीच्या दराने मोठी आगेकूच केली . सोन्याच्या किमतींमध्ये हजारोंनी होणारे बदल, घसरण या सगळ्यामुळे सर्वसामान्यांना सोने खरेदी (Gold Price) विषयी प्रचंड धाकधूक वाढली होती. सोन्यात पैसे गुंतवावे की नाही? याबाबत अजूनही संभ्रमावस्थेत नागरिक आहेत. दरम्यान गेल्या आठवड्यात झालेल्या मोठ्या घसरणीनंतर सोन्या -चांदीच्या दारात पुन्हा वाढ झाली . जागतिक बाजारात सोन्याच्या किमती घसरल्यानंतर आज 24 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 56 हजार 280 रुपये झाला आहे.
आठवड्याभरापूर्वी सोन्याचा दर 1 लाख 52 हजार 300 रुपये होता. त्यामुळे आठवड्याभराचा ट्रेंड पाहता सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत. तर चांदीचा दर सध्या किलोमागे 2 लाख 46 हजार 160 रुपयांवर आहे. मागील महिन्यात हाच दर दोन लाख 37 हजार 670 एवढा होता. चांदीत जवळपास 10 हजारांची वाढ आहे.
सोन्या चांदीचे आजचे दर
बुलियनस असोसिएशनच्या ताज्या आकडेवारीनुसार, 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम दर सध्या एक लाख 56 हजार 280 रुपयांवर आहे. तर किलोमागे चांदीचा दर दोन लाख 46,160 रुपयांवर गेला आहे. काल सोन्याचा दर 1 लाख 55 हजार 760 एवढा होता. तर चांदीचा दर काल दोन लाख 46,180 रुपये होता. 22 कॅरेट सोन्यासाठी नागरिकांना 143,257 रुपये मोजावे लागतील.
सोन्या चांदीच्या दरात इतके चढ उतार कशाने?
- जागतिक बाजारात सोन्याच्या किमती घसरल्यानंतर, देशांतर्गत सोन्या-चांदीच्या बाजारात दबाव दिसत आहे. अमेरिकन फेडरल रिजर्वच्या FOMC च्या मिनिटांनी आगामी चलन विषयक धोरणांमध्ये अधिक आक्रमक भूमिका घेण्याचे संकेत दिल्यानंतर हा दबाव आणखी ठळकपणे दिसून येत आहे. या आठवड्यात जाहीर होणाऱ्या प्रमुख जीडीपी आणि पीसीई डेटावर गुंतवणूकदारांचे लक्ष आहे.
-दरम्यान युएस फेड रिझर्वने व्याजदर कपातीची आशा कमी केल्यामुळे देशांतर्गत सोन्याचा दर घसरला. अमेरिकन फेडच्या शेवटच्या धोरण बैठकीच्या मिनिटांमध्ये धोरणकर्त्यांमध्ये व्याजदरावरील पुढचे पाऊल काय असेल. त्यामुळे डॉलर मजबूत झाला. आणि सोन्याचा दर घसरला.
-अमेरिकन फेडच्या जानेवारीतील बैठकीत अधिकाऱ्यांमध्ये पुढील दर कपातीवरून संमिश्र मते दिसली. काहींना महागाई कमी झाल्यास व्याजदर आणखी कमी होण्याची शक्यता सांगितली. तर काहींनी किमतींवर दबाव कायम राहिल्यास धोरण कडक करण्याची तयारी दर्शवलेली.
-दुसरीकडे युक्रेन आणि रशिया यांच्या बैठकीचा परिणामही सोने-चांदीच्या आंतरराष्ट्रीय किमतींवर दिसून आला. या दोन्ही देशांमध्ये दोन दिवसांच्या शांतता चर्चा कोणत्याही निष्कर्षाशिवाय संपल्या. त्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीसाठी पुन्हा सोन्याचांदीकडे वळले. त्यामुळे सोन्या चांदीच्या दरामध्ये पुन्हा वाढ झाली.
























