Gold Silver rates 12 December : आज सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याच्या किंमतींमध्ये (Gold Rate Today) वाढ तर 22 कॅरेट सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. तर चांदीच्या किंमतीत काय बदल आहेत? जाणून घेण्यासाठी बातमी सविस्तर वाचा
सोन्याच्या भावात कितीने वाढ?
आज सकाळी जाहीर झालेल्या सोने दरानुसार, 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीमध्ये 100 रुपयांची वाढ झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचे दर 54,600 रुपये प्रति तोळा आहेत. तर 22 कॅरेट सोने खरेदीसाठी ग्राहकांना 50,040 रुपये प्रति तोळा खर्च करावे लागतील. चांदीच्या किंमती आज 68,200 रुपये प्रति किलो नोंदवण्यात आली आहेत. काल त्या 68,100 रुपये प्रति किलोच्या घरात आहेत. कालच्या तुलनेत त्यात 100 रुपयांची वाढ झाली आहे.
शहर सोने 22 कॅरेट (रु.प्रति तोळा) सोने 24 कॅरेट (रु.प्रति तोळा) चांदी (रु.प्रति किलो)चेन्नई 50550 55150 730000मुंबई 49900 54400 681000नवी दिल्ली 50040 54600 682000कोलकाता 49900 54400 681000बंगळूरु 49950 54490 730000हैदराबाद 49900 54400 730000केरळ 49900 54440 730000पुणे 49900 54400 681000वडोदरा 49950 54490 681000
आंतराष्ट्रीय बाजारातील दरजागतिक बाजारात, सोने 9.59 डॉलरने घसरून $1,787.70 प्रति औंसवर व्यवहार करत होते. त्याच वेळी, चांदी प्रति औंस $ 0.18 ने घसरले आहे आणि $ 23.30 प्रति औंस आहे.
सोनं खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता कशी तपासावी? (Check Gold Purity) :
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.