Gold Silver Rate Today : दिवाळी (Diwali) सण तोंडावर आला असताना लोकांची खरेदीसाठी (Shopping) लगबग सुरु आहे. अशात एक खुशखबर आहे. आज सोने-चांदीच्या दरात (Gold Silver Price) घसरण झाली आहे. त्यामुळे दिवाळी (Diwali 2023) आणि लग्नसराईच्या खरेदीच्या विचारात करत असणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यूएस बॉण्ड (US Bond) उत्पन्नामध्ये किंचित वाढ झाल्यामुळे सोन्याच्या किमतीत किंचित घसरण (Gold Rate) झाली आहे. गुडरिटर्न्स (Goodreturns) च्या वेबसाईटनुसार, आज 7 नोव्हेंबरला 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 110 रुपयांनी घसरून 61,360 रुपयांवर आला आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 100 रुपयांनी घसरून 56,250 रुपयांवर आला आहे.
सोने-चांदीच्या दरात घसरण
मुंबई (Mumbai), कोलकाता (Kolkata) आणि बंगळुरू (Banglore) येथे 61,470 रुपये आहे. दिल्लीमध्ये सोन्याचा दर 61,610 रुपये आहे, सोमवारी हे दर 61,790 रुपये होते. चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम भाव 62,180 रुपये आहे. सोन्यासह चांदीच्या दरातही घट झाली आहे. आज मंगळवारी एक किलो चांदीचा दर 74,500 रुपये आहे. चांदीचा दर () 700 रुपये प्रति किलोने कमी झाले आहेत. सोमवारी एक किलो चांदीचा दर 75,200 रुपये होता.
देशातील चार प्रमुख मेट्रो शहरांमध्ये सोन्याचे दर (24 कॅरेट)
- मुंबई - मुंबईत सोने 110 रुपयांनी स्वस्त होऊन 61360 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. (Mumbai Gold Rate Today)
- दिल्ली - 110 रुपयांनी स्वस्त होऊन सोने 61510 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले आहे. (Delhi Gold Rate Today)
- कोलकाता - सोने 110 रुपयांनी स्वस्त होऊन 61360 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. (Kolkata Gold Rate Today)
- चेन्नई - सोने 330 रुपयांनी स्वस्त होऊन 61850 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. (Chennai Gold Rate Today)
महाराष्ट्रातील विविध राज्यातील सोन्याचे दर (Maharashtra Gold Rate)
- पुणे - 61360 रुपये 110 रुपयांनी स्वस्त (Pune Gold Rate)
- नाशिक - 61390 रुपये 110 रुपयांनी स्वस्त (Nashik Gold Rate)
- नागपूर - 61360 रुपये 110 रुपयांनी स्वस्त (Nagpur Gold Rate)
- कोल्हापूर - 61360 रुपये 110 रुपयांनी स्वस्त (Kolhapur Gold Rate)
- जळगाव - 61000 रुपये (Jalgaon Gold Rate)
खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्ता तपासा (Check Gold Purity) :
तुम्ही सोने खरेदी (Gold Rate) करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता (Gold Purity) नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क (Hallmark) केलेल्या दागिन्यांची शुद्धता (Gold Jewellery Purity Check) सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू (How to Check Gold Purity) शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :