Gold-Silver Rate Today : आखातीदेशातीलयुद्धाचीझळआताजगासहभरतालादेखीलबसतअसल्याचेसमोरआलंआहे. परिणामी पुढील वर्षभर देशवासियांनी सोनं (Gold) खरेदी करू नये, तसंच पेट्रोल डिझेलचा (Petrol Diesel) वापरही कमीत कमी करावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केलं. याचदरम्यान, नरेंद्र मोदींच्या या आवाहनानंतर केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. सोने आणि चांदीच्या (Gold-Silver)  आयातशुल्कात मोठी वाढ करण्यात आली आहे. सोने,चांदीवरील आयातशुल्क 6% वरुन 15% वर करण्यात आली आहे. आजपासूनच 15% आयातशुल्क लागू  करण्यात आला आहे. असेअसतानायाचापरिणामआता सराफाबाजारावरहोतानादिसतअसून सोने चांदी दरात मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे.(Gold-Silver Marathi News)

Continues below advertisement

चांदीच्यादराततब्बल 30,000 हजारांची वाढ, सोन्याच्यादरातकितीनेवाढ?

दरम्यान, आज बाजारपेठ उघडताच सोनेचांदीच्यादारातवाढझालीआहे. काल (12 मे) सोन्याचेदार 1,51,000 होते. त्यात आता अकरा हजारांची वाढ होऊन सोन्याचे हेचदरआता 1,62,000 वर पोहोचले आहे. तर चांदीच्यादराततब्बल 30,000 हजारांची वाढ होऊन हेचदर 2,98,000 वरपोहचलेआहे. दरम्यानहेच दर काल (12 मे) 2, 98,000 इतकेहोते.

Continues below advertisement

PM Modi : नरेंद्र मोदींच्या आवाहनामागील मोठी कारणं काय?

सोने-चांदीची आयात रोखण्यासाठी केंद्र सरकारचे हे महत्वाचे पाऊल असल्याचं बोललं जात आहे. तसेच सोने आणि चांदीच्या 15 टक्क्यांच्या आयातशुल्कामधील 5 टक्के आयातशुल्क कृषी, विकास कामांवर खर्च होणार आहे. एकंदरीत पाहता, या सर्व घटकांमुळे सरकारवर आपला डॉलर साठा जपून ठेवण्याचा दबाव वाढला आहे. याचे कारण असे की, जेव्हा जेव्हा भारत वस्तूंची आयात करतो, उदा. तेल, वायू (गॅस), सोने किंवा खते तेव्हा त्याचे पेमेंट (पैसे) डॉलरमध्ये केले जाते. परिणामी, जेव्हा वस्तूंच्या किमती वाढतात, तेव्हा अधिक प्रमाणात डॉलर खर्च करावे लागतात. यामुळे परकीय चलन साठ्यावर ताण येतो आणि रुपयाची स्थिती कमकुवत होते. नेमक्या याच कारणामुळे सरकार जनतेला अनावश्यक खर्च कमी करण्याचे आवाहन करत आहे. जसे की सोन्याची खरेदी करणे, इंधनाचा अतिवापर करणे किंवा परदेश प्रवास करणे. अशा उपाययोजनांमुळे डॉलरची बचत होईल आणि अर्थव्यवस्थेला स्थिर ठेवण्यास मदत मिळेल. पंतप्रधानांचे हे आवाहन एक 'सावधगिरीचा उपाय' म्हणून पाहिले जात आहे; जागतिक संकटाच्या काळात भारताच्या आर्थिक स्थितीचा समतोल राखण्यासाठी आणि भविष्यात येऊ शकणाऱ्या मोठ्या आर्थिक धक्क्यांपासून संरक्षण मिळवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

नरेंद्र मोदींनी देशाला कोणती आवाहनं केली? (Narendra Modi On Gold Petrol Diesel)

  1. सोन्याची खरेदी टाळा
  2. पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा 
  3. वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या
  4. परदेश प्रवास टाळा
  5. खाद्यतेलाचा वापर कमी करा
  6. नैसर्गिक शेतीचा अवलंब करा
  7. स्वदेशी उत्पादनं वापरा  

संबंधित बातमी:

Narendra Modi On Gold Petrol Diesel: सलग दोन दिवस नरेंद्र मोदींकडून सोनं न खरेदी करण्याचं आवाहन; आंतरराष्ट्रीय विषयाच्या अभ्यासकांनी सांगितलं मुख्य कारण!