एक्स्प्लोर

Gold-Silver Rate Today : 5-10 हजार नव्हे...PM मोदींच्या आवाहनानंतर सोन्याच्या दरात एका दिवसांत सर्वाधिक वाढ; सराफा बाजारात खळबळ, चांदीही 30 हजारांनी महाग

Gold-Silver Marathi News: आजपासून 15% आयातशुल्क लागू  करण्यात आला आहे. असे असतानाच याचा परिणाम आता सराफा बाजारावर होताना दिसत असून सोने चांदी दरात मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे.

Gold-Silver Rate Today : आखाती देशातील युद्धाची झळ आता जगासह भरताला देखील बसत असल्याचे समोर आलं आहे. परिणामी पुढील वर्षभर देशवासियांनी सोनं (Gold) खरेदी करू नये, तसंच पेट्रोल डिझेलचा (Petrol Diesel) वापरही कमीत कमी करावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केलं. याचदरम्यान, नरेंद्र मोदींच्या या आवाहनानंतर केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. सोने आणि चांदीच्या (Gold-Silver)  आयातशुल्कात मोठी वाढ करण्यात आली आहे. सोने,चांदीवरील आयातशुल्क 6% वरुन 15% वर करण्यात आली आहे. आजपासूनच 15% आयातशुल्क लागू  करण्यात आला आहे. असे असताना याचा परिणाम आता सराफा बाजारावर होताना दिसत असून सोने चांदी दरात मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे.(Gold-Silver Marathi News)

चांदीच्या दरात तब्बल 30,000 हजारांची वाढ, सोन्याच्या दरात कितीने वाढ?

दरम्यान, आज बाजारपेठ उघडताच सोने चांदीच्या दारात वाढ झाली आहे. काल (12 मे) सोन्याचे दार 1,51,000 होते. त्यात आता अकरा हजारांची वाढ होऊन सोन्याचे हेच दर आता 1,62,000 वर पोहोचले आहे. तर चांदीच्या दरात तब्बल 30,000 हजारांची वाढ होऊन हेच दर 2,98,000 वर पोहचले आहे. दरम्यान हेच दर काल (12 मे) 2, 98,000 इतके होते.

PM Modi : नरेंद्र मोदींच्या आवाहनामागील मोठी कारणं काय?

सोने-चांदीची आयात रोखण्यासाठी केंद्र सरकारचे हे महत्वाचे पाऊल असल्याचं बोललं जात आहे. तसेच सोने आणि चांदीच्या 15 टक्क्यांच्या आयातशुल्कामधील 5 टक्के आयातशुल्क कृषी, विकास कामांवर खर्च होणार आहे. एकंदरीत पाहता, या सर्व घटकांमुळे सरकारवर आपला डॉलर साठा जपून ठेवण्याचा दबाव वाढला आहे. याचे कारण असे की, जेव्हा जेव्हा भारत वस्तूंची आयात करतो, उदा. तेल, वायू (गॅस), सोने किंवा खते तेव्हा त्याचे पेमेंट (पैसे) डॉलरमध्ये केले जाते. परिणामी, जेव्हा वस्तूंच्या किमती वाढतात, तेव्हा अधिक प्रमाणात डॉलर खर्च करावे लागतात. यामुळे परकीय चलन साठ्यावर ताण येतो आणि रुपयाची स्थिती कमकुवत होते. नेमक्या याच कारणामुळे सरकार जनतेला अनावश्यक खर्च कमी करण्याचे आवाहन करत आहे. जसे की सोन्याची खरेदी करणे, इंधनाचा अतिवापर करणे किंवा परदेश प्रवास करणे. अशा उपाययोजनांमुळे डॉलरची बचत होईल आणि अर्थव्यवस्थेला स्थिर ठेवण्यास मदत मिळेल. पंतप्रधानांचे हे आवाहन एक 'सावधगिरीचा उपाय' म्हणून पाहिले जात आहे; जागतिक संकटाच्या काळात भारताच्या आर्थिक स्थितीचा समतोल राखण्यासाठी आणि भविष्यात येऊ शकणाऱ्या मोठ्या आर्थिक धक्क्यांपासून संरक्षण मिळवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

नरेंद्र मोदींनी देशाला कोणती आवाहनं केली? (Narendra Modi On Gold Petrol Diesel)

  1. सोन्याची खरेदी टाळा
  2. पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा 
  3. वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या
  4. परदेश प्रवास टाळा
  5. खाद्यतेलाचा वापर कमी करा
  6. नैसर्गिक शेतीचा अवलंब करा
  7. स्वदेशी उत्पादनं वापरा  

संबंधित बातमी:

Narendra Modi On Gold Petrol Diesel: सलग दोन दिवस नरेंद्र मोदींकडून सोनं न खरेदी करण्याचं आवाहन; आंतरराष्ट्रीय विषयाच्या अभ्यासकांनी सांगितलं मुख्य कारण!

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

AVI Polymers : 1:10 बोनस शेअर्स आणि 10:1 स्टॉक स्प्लिटची एकत्र घोषणा; 'या' शेअरमध्ये लागला 5 टक्क्यांचा अप्पर सर्किट!
1:10 बोनस शेअर्स आणि 10:1 स्टॉक स्प्लिटची एकत्र घोषणा; 'या' शेअरमध्ये लागला 5 टक्क्यांचा अप्पर सर्किट!
50 रुपयांपेक्षा स्वस्त पण गोल्डन क्रॉसओव्हर सिग्नल, 5 ईटीएफ्स कोणते? यादी तपासा
50 रुपयांपेक्षा स्वस्त पण गोल्डन क्रॉसओव्हर सिग्नल, 5 ईटीएफ्स कोणते? यादी तपासा
मुलांचं शिक्षण, नोकरी ते निवृत्ती, LIC च्या 'या' योजना देतात महत्वपूर्ण लाभ, जाणून घ्या सविस्तर माहिती 
मुलांचं शिक्षण, नोकरी ते निवृत्ती, LIC च्या 'या' योजना देतात महत्वपूर्ण लाभ, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Share Market : सेन्सेक्स निफ्टी मध्ये आठवड्यात घसरण,आदित्य इन्फोटेक सर्वाधिक फायद्यात, नॅटको फार्माला सर्वाधिक फटका
सेन्सेक्स निफ्टी मध्ये आठवड्यात घसरण,आदित्य इन्फोटेक सर्वाधिक फायद्यात, नॅटको फार्माला फटका
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report
Konkan Politics : बाळ मानेंच्या माघारीनंतर हकालपट्टी; भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग | ABP Majha
Dhairyasheel Mohite Solapur : उत्तमराव जानकर म्हणाले, केसांनी गळा कापला; धैर्यशील मोहितेंचं उत्तर
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tamil Nadu BJP Crisis: अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू भाजपत भगदाड; उपाध्यक्ष सचिवांसह 15 जणांचा पक्षाला रामराम
अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू भाजपत भगदाड; उपाध्यक्ष सचिवांसह 15 जणांचा पक्षाला रामराम
Cockroach Janta Party: कॉकरोच पार्टीने आंदोलनासाठी परवानगी मागितली की नाही? किती हजार पोलिस तैनात अन् विमानतळापासून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर काय होणार??
कॉकरोच पार्टीने आंदोलनासाठी परवानगी मागितली की नाही? किती हजार पोलिस तैनात अन् विमानतळापासून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर काय होणार??
न्यू चंदीगड कसोटीत गिल विरुद्ध अफगाणिस्तान! संपूर्ण अफगाण संघापेक्षा जास्त धावा अन् एकट्या सिराजच्या 10 पटींहून अधिक विकेट
न्यू चंदीगड कसोटीत गिल विरुद्ध अफगाणिस्तान! संपूर्ण अफगाण संघापेक्षा जास्त धावा अन् एकट्या सिराजच्या 10 पटींहून अधिक विकेट
Trinamool Congress: पक्षात दोन तुकडे झाल्यानंतरही तृणमल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींचा तगडा निर्णय; फुटीर आमदारांना थेट संदेश दिल्याची चर्चा
पक्षात दोन तुकडे झाल्यानंतरही तृणमल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींचा तगडा निर्णय; फुटीर आमदारांना थेट संदेश दिल्याची चर्चा
Mumbai Mangroves : मुंबईकरांनो सावधान! पुरापासून वाचवणारी 'कांदळवने' धोक्यात; एकाच प्रकल्पासाठी 45,000 झाडांवर चालणार कुऱ्हाड
मुंबईकरांनो सावधान! पुरापासून वाचवणारी 'कांदळवने' धोक्यात; एकाच प्रकल्पासाठी 45,000 झाडांवर चालणार कुऱ्हाड
कर्नाटकात अवघ्या 48 तासांमध्येच भूकंप, सीएम डीकेंच्या निष्ठावंत शिलेदाराचाच मंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा; 'संकटमोचक' डीके म्हणाले...
कर्नाटकात अवघ्या 48 तासांमध्येच भूकंप, सीएम डीकेंच्या निष्ठावंत शिलेदाराचाच मंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा; 'संकटमोचक' डीके म्हणाले...
शेअर बाजारात 99 टक्के बोगस कमाई, 15 लाख कोटींचा ढपला अन् याच राजेश एक्सपोर्ट्समध्ये LICची 10.8 टक्के हिस्सेदारी! देशातील महाघोटाळा असल्याची चर्चा
शेअर बाजारात 99 टक्के बोगस कमाई, 15 लाख कोटींचा ढपला अन् याच राजेश एक्सपोर्ट्समध्ये LICची 10.8 टक्के हिस्सेदारी! देशातील महाघोटाळा असल्याची चर्चा
Share Market : सेन्सेक्स निफ्टी मध्ये आठवड्यात घसरण,आदित्य इन्फोटेक सर्वाधिक फायद्यात, नॅटको फार्माला सर्वाधिक फटका
सेन्सेक्स निफ्टी मध्ये आठवड्यात घसरण,आदित्य इन्फोटेक सर्वाधिक फायद्यात, नॅटको फार्माला फटका
Embed widget