Gold Silver Rate: सोनं चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी थोडी निराशाजनक बातमी आहे. कारण पुन्हा सोन्याच्या आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सध्या सणासुदीचा हंगाम सुरु आहे. या काळात मोठ्या प्रमाणात सोनं आणि चांदीची खरेदी होत असते. मात्र, अशातच आता दरात वाढ झाल्यानं खरेदीदारांच्या खिशाला कात्री लागणार आहे. तुम्ही जर आज सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज सोन्याचा भाव 61000 रुपयांच्या वर गेला आहे. तर महाराष्ट्रात सोनं 62 हजारांच्या जवळ पोहोचलं आहे. 


सणासुदीच्या हंगामाच्या सुरूवातीस, लोक मोठ्या प्रमाणावर सोन्या-चांदीच्या दागिन्यांची खरेदी करतात. जर तुम्ही आज सोने खरेदी करण्याचा विचार करत तुमच्या खिशाला जास्तीचा भार पडू शकतो. आज सोन्याचा भाव 61000 रुपयांच्या वर गेला आहे. फ्युचर्स मार्केट म्हणजेच मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोने 60,915 रुपयांच्या पातळीवर उघडले. यानंतर, सकाळी 10 वाजून 15 मी. पर्यंत सोन्याचा दर हा 61 हजार 24 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे, कालच्या तुलनेत सोने आज 72 रुपयांनी म्हणजेच 0.12 टक्क्यांनी महाग झाले आहे. गुरुवारी  सोने 60 हजार 952 रुपये होते. 


चांदीच्या दरातही वाढ


शुक्रवारी सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात चांदी 71 हजार 745 रुपये प्रति किलोच्या पातळीवर उघडली. यानंतर, 10.15 मिनिटांपर्यंत चांदीमध्ये आणखी वाढ नोंदवली गेली आणि कालच्या तुलनेत आज 287 रुपयांनी म्हणजेच 0.40 टक्क्यांनी महाग झाली. आज सोन्याचा दर हा 71 हजार 867 रुपयांच्या पातळीवर आहे. काल वायदे बाजारात चांदी 71 हजार 580 रुपये प्रति किलोवर बंद झाली.


जाणून घ्या प्रमुख शहरांमधील सोन्या-चांदीचे भाव


नवी दिल्ली- 24 कॅरेट सोने 62,110 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 74,600 रुपये प्रति किलोग्रॅम 
मुंबई- 24 कॅरेट सोने 61,960 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 74,600 रुपये किलो


कोलकाता- 24 कॅरेट सोने 61,960 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 74,600 रुपये प्रति किलोग्रॅम


चेन्नई - 24 कॅरेट सोने  62,250 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 77,500 रुपये किलो 
पुणे- 24 कॅरेट सोने 61,960 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 74,600 रुपये किलो 
जयपूर- 24 कॅरेट सोने 62,110 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 74,600 रुपये किलो 
लखनौ- 24 कॅरेट सोने 62,110 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 74,600 रुपये किलो 
पाटणा- 24 कॅरेट सोने 62,010 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 74,600 रुपये किलो 
गाझियाबाद- 24 कॅरेट सोने 62,110 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 74,600 रुपये किलो 
गुरुग्राम- 24 कॅरेट सोने 62,110 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 74,600 रुपये प्रति किलो 
नोएडा- 24 कॅरेट सोने 62,110 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 74,600 रुपये प्रति किलो 


आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीची काय स्थिती आहे?


देशांतर्गत बाजाराव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ दिसून येत आहे. मेटल रिपोर्टनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात आद सोन्याच्या दरात 0.21 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. कालच्या तुलनेत आज चांदीच्या दरात 0.59 टक्क्यांची वाढ झाली आहे. इस्रायल-हमास युद्धाच्या सुरुवातीपासूनच गुंतवणूकदार सोन्याचा विश्वासार्ह पर्याय म्हणून विचार करत आहेत. अशा स्थितीत त्याचा परिणाम सोन्याच्या किमतीवर स्पष्टपणे दिसून येत आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Gold : भारतात सोन्याची तस्करी वाढली, चोरीचे तब्बल 2000 किलो सोने जप्त