सणासुदीच्या काळात ग्राहकांना मोठी संधी! सोन्या चांदीच्या दरात अचानक मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर
सोन्या चांदीची खरेदी करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं सोने चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे.
Gold Silver Rate News : सोन्या चांदीची खरेदी करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं सोने चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्या चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत होती. त्यामुळं ग्राहकांच्या खिशाला झळ लागत होती. अशातच आज सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. जाणून घेऊयात आजचे दर.
आज, 12 सप्टेंबर 2026 सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा दिवस आहे. आज सराफा बाजारात सोन्याच्या दरात 2700 आणि चांदीच्या दरात 10 हजार रुपयांची लक्षणीय घसरण झाली. देशभरातील विविध शहरांमध्ये सोन्या-चांदीचे नवीन दर आता जाहीर झाले आहेत.
आज भारतात सोन्याचा भाव काय?
आज, 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1 लाख 55 हजार 900 रुपये आहे. तर 22-कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम सुमारे 1.42 लाख आहे. वेगवेगळ्या शहरांतील स्थानिक बाजारपेठेनुसार दरांमध्ये बदल होतो.
आज चांदीचा भाव काय?
सोन्यासोबतच, गेल्या काही दिवसांत चांदीच्या दरातही लक्षणीय चढ-उतार दिसून आले आहेत. काल जो भाव 2 लाख 44 हजार 600 रुपये प्रति किलोग्राम होता, तो आज बदलला आहे. 12 सप्टेंबर रोजी, भारतात चांदीचा भाव प्रति किलोग्राम 10 हजार ने घसरून 3 लाख 34 हजार 600 प्रति किलोग्राम झाला.
जागतिक बाजारात काय स्थिती?
देशांतर्गत बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर, आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या किमती पुन्हा मजबूत झाल्या. शुक्रवारी स्पॉट गोल्डमध्ये 1 टक्केपेक्षा जास्त वाढ झाली. साप्ताहिक पातळीवर सोने कमजोर राहिले.
सोन्याची खरेदी करावी की नको?
जर तुम्ही लग्न, सण किंवा इतर कोणत्याही महत्त्वाच्या कारणासाठी सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर केवळ एका दिवसाच्या घसरणीवर आधारित निर्णय घेणे शहाणपणाचे नाही. सोन्याच्या किमतींवर अमेरिकेतील व्याजदर, डॉलर, रुपया, कच्चे तेल, महागाई आणि सध्याच्या जागतिक तणावाचा प्रभाव असतो. त्यामुळे, येत्या काही दिवसांत किमतींमध्ये चढ-उतार सुरू राहू शकतात. जर तुम्ही दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर 22 -कॅरेट सोन्याचा भाव पाहणे उत्तम राहील. गुंतवणुकीसाठी, तुम्ही 24-कॅरेट सोन्याचा भाव आणि गोल्ड ईटीएफ (Gold ETFs) पाहू शकता.
सोने खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा
तुम्हाला ऑनलाइन दिसणारा सोन्याचा दर आणि दागिने खरेदी करताना द्यावी लागणारी किंमत सारखीच असेलच असे नाही. दागिन्यांच्या किमतीमध्ये जीएसटी, घडणावळ शुल्क आणि अतिरिक्त शुल्क समाविष्ट असतात. त्यामुळे, दुकानात किंमत विचारताना, फक्त 10 ग्रॅमचा दर विचारू नका. सोन्याची शुद्धता, घडणावळ शुल्क, जीएसटी आणि संपूर्ण बिलाची रक्कम नक्की तपासा.
महत्त्वाच्या बातम्या




















