Gold Silver Rate News : सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशभरातील बहुतांश शहरांमध्ये सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. आज सकाळी, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या दरात किंचित घट झाली आहे, तर चेन्नईमध्ये दरात वाढ दिसून आली आहे. कोणत्या शहरात सोन्याला किती दर याबाबतची माहित पाहुयात.
कोणत्या शहरात सोन्याला किती दर?
राजधानी दिल्लीत 24-कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1 लाक 52 हजार 870 वर पोहोचला आहे. मुंबईत 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 1 लाख 52 हजार 670 दराने विकले जात आहे. आदल्या दिवशी, म्हणजेच शुक्रवारी, दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 100 ने घसरून प्रति 10 ग्रॅम 1 लाख 55 हजार 900 वर आला होता.
देशभरातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे नवीनतम दर
शहर 22 कॅरेट 24 कॅरेट
दिल्ली - 1,40,090 1,52,870मुंबई - 1,39,940 1,52,670अहमदाबाद- 1,39,940 1,52,720चेन्नई- 1,41,030 1,53,850कोलकाता- 1,39,940 1,52,670हैदराबाद- 1,39,940 1,52,670जयपुर- 1,40,090 1,52,870भोपाल - 1,39,940 1,52,720लखनऊ- 1,40,090 1,52,870चंडीगढ़ - 1,40,090 1,52,870
चांदीच्या किंमती वाढ
सोन्याच्या तुलनेत चांदीचे भाव मजबूत राहिले आहेत. 9 मे रोजी सकाळी चांदीचा भाव प्रति किलोग्राम 2 लाख 75 हजार 100 पर्यंत वाढला.
एक दिवसापूर्वी काय परिस्थिती होती?
एक दिवसापूर्वी, दिल्ली सराफा बाजारात चांदीचा भाव 200 ने घसरून प्रति किलोग्राम 2 लाख 61 हजार 300 वर आला होता. मात्र, आता त्यात पुन्हा वाढ होताना दिसत आहे.