Gold Silver Rate : सोन्या चांदीची खरेदी करणाऱ्यांना पुन्हा मोठा धटका बसला आहे. कारण आज पुन्हा सोन्याच्या दरात वाढ दिसून आली. भारतात 24 कॅरेट सोन्याची किंमत 8734.3 रुपये प्रति ग्रॅम आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 8008.3 रुपये प्रति ग्रॅमवर पोहोचली आहे. त्याचवेळी चांदीच्या भावातही वाढ झाली आहे. चांदेच दर 1200 रुपयांनी वाढून 103700 रुपये किलोवर पोहोचला आहे. दरम्यान, सतत वाढत जाणाऱ्या दरामुळं सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? असा सवाल ग्राहक करताना दिसत आहेत.
तुमच्या शहरात सोन्याचा दर काय?
नवी दिल्ली
दिल्लीत आज 15 फेब्रुवारी 2025 रोजी सोन्याची किंमत 87,343.0 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. काल म्हणजेच 14 फेब्रुवारी 2025 रोजी ही किंमत 86833 रुपये होती, तर गेल्या आठवड्यात 9 फेब्रुवारी 2025 रोजी ती 86843 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी नोंदवली गेली.
जयपूर
जयपूरमध्ये आजचा सोन्याचा भाव 87,336.0 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. काल, 14 फेब्रुवारी 2025 रोजी ते 86,826.0 रुपये होते, तर 9 फेब्रुवारी 2025 रोजी ते 86,836.0 रुपये प्रति 10 ग्रॅम होते.
लखनौ
लखनऊमध्ये आज सोन्याचा भाव 87,359 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. गेल्या दिवशी हा भाव 86,849 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, तर आठवड्यापूर्वी सोन्याचा भाव 86,859 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.
चंदीगड
आज चंदीगडमध्ये सोन्याचा भाव 87,352 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका नोंदवला गेला आहे. काल तो 86,842 रुपये प्रति 10 ग्रॅम होता आणि आठवड्यापूर्वी सोन्याचा भाव 86,852 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.
भविष्यात सोन्याच्या किमती वाढण्याची शक्यता
सोने ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. जी महागाईच्या काळात त्याचे मूल्य टिकवून ठेवते. जेव्हा इतर मालमत्तेच्या किंमती कमी होतात. तेव्हा सोन्याच्या किंमती अनेकदा वाढतात. त्याचबरोबर सोन्याच्या किमती जागतिक बाजारावर अवलंबून असतात. जागतिक स्तरावर अनिश्चितता किंवा आर्थिक संकट आल्यास सोन्याची मागणी वाढते आणि त्याचे मूल्य वाढते. जर तुम्ही दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सोने हा एक चांगला पर्याय असू शकतो. ऐतिहासिकदृष्ट्या, सोन्याने दीर्घकाळात चांगला परतावा दिला आहे. अर्थसंकल्प 2025 मध्ये, सरकारने आयात शुल्कात कपात करण्याची घोषणा केली आहे. ज्यामुळं सोने आणि चांदीच्या किमतींना दिलासा मिळाला आहे. मात्र, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही आयात शुल्क वाढवण्याचे संकेत दिले असून त्यामुळे भविष्यात सोन्याच्या किमती वाढू शकतात.