Gold-Silver Price Today on 31st July: आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत किरकोळ घसरण (Gold-Silver Price) पाहायला मिळत आहे. अमेरिकन कमोडिटी एक्सचेंज (COMEX) वर सोने ०.१९% च्या घसरणीसह ४,१५२.६ डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे, भारतीय स्थानिक सराफा (Gold-Silver Price) बाजारात याउलट चित्र पाहायला मिळत असून सोने कालच्या तुलनेत ०.९१% ने वाढून व्यवहार करत आहे. या तेजीमुळे आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,४३,८२० रुपयांवर पोहोचला आहे, तर काल हा दर १,४२,५३० रुपये होता. म्हणजेच कालच्या तुलनेत सोन्याच्या दरात १२९० रुपयांची थेट वाढ झाली आहे.(Gold-Silver Price)
Gold-Silver Price : २२ आणि १८ कॅरेटचा दर
२४ कॅरेटप्रमाणेच २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरातही आज वाढ नोंदवण्यात आली आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर आज १,३१,८४३ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे, जो काल १,३०,६५३ रुपये होता. म्हणजेच त्यात ११९० रुपयांची वाढ झाली आहे. तर १८ कॅरेट सोन्याचा दर आज १,०७,८६५ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. कालच्या १,०६,८९३ रुपयांच्या तुलनेत यामध्ये ९७२ रुपयांची वाढ झाली आहे.(Gold-Silver Price)
Gold-Silver Price : अचानक का वाढले सोन्याचे भाव?
सोन्याच्या दरात आज अचानक झालेल्या या मोठ्या वाढीचे मुख्य कारण म्हणजे अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा एकदा वाढलेला तणाव हे आहे. इराकमध्ये इराण समर्थित विद्रोही गट 'पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्सेस' (PMF) कडून अमेरिकन लष्करी तळ आणि सौदी अरेबियाच्या तेल शुद्धीकरण कारखान्यांवर सतत केल्या जाणाऱ्या ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून काल अमेरिकन सैन्याने इराकमध्ये मोठा बाँबहल्ला केला आहे.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या हिताला धक्का पोहोचवणाऱ्यांना अधिक कडक धडा शिकवण्याचा इशारा दिला आहे. जागतिक स्तरावर जेव्हा जेव्हा युद्ध किंवा अशांततेचे वातावरण निर्माण होते, तेव्हा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढते; कारण गुंतवणूकदार शेअर बाजारासारख्या धोकेदायक ठिकाणाहून पैसे काढून सोन्यामध्ये सुरक्षित गुंतवणूक करतात.
Gold-Silver Price : चांदीचा दर किती?
COMEX वर चांदीचे दर ०.१२% ने वाढून ५९.०९ डॉलर प्रति ट्रॉय औंसच्या पातळीवर आहेत. तर, स्थानिक बाजारात चांदीचा भाव १.०८% ने वाढून २.२० लाख रुपये प्रति किलोग्रामवर पोहोचला आहे. युद्धाच्या सावटात चांदीलाही एक सुरक्षित मालमत्ता मानले जाते. याशिवाय सोलर पॅनेल आणि संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स (Defense Electronics) क्षेत्रात वाढत्या औद्योगिक मागणीमुळेही चांदीचे भाव वधारत आहेत.
