Gold Silver Price Today:जळगाव जिल्ह्यातील सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात शनिवारी वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या चोवीस तासांत सोन्याच्या दरात तब्बल 2,500 रुपयांची वाढ झाली असून, 10 ग्रॅम (एक तोळा) सोन्याचा दर 1 लाख 54 हजार 500 रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीच्या दरातही 5,000 रुपयांची वाढ होऊन, एक किलो चांदीचा दर 2 लाख 60 हजार रुपयांवर गेला आहे. हे सर्व दर जीएसटीशिवायचे असल्याची माहिती सराफ व्यावसायिकांनी दिली आहे.

शनिवारी (7 फेब्रुवारी 2026) सकाळीच पुन्हा एकदा सोने–चांदी महागल्याची बातमी समोर आली. मुंबई सराफ बाजारात 24 कॅरेट शुद्ध 10 ग्रॅम सोन्याचा दर 1 लाख 56 हजार 600 रुपयांवर पोहोचला आहे. याआधी शुक्रवारी हा दर 1 लाख 53 हजार 710 रुपये होता. अवघ्या 24 तासांत मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या दरात 2,890 रुपयांची वाढ झाली आहे.

Gold Silver Price Today: चांदीच्या दरातदेखील उसळी

तसेच मुंबईत 22 कॅरेट शुद्ध 10 ग्रॅम सोन्याचा दर 1 लाख 43 हजार 550 रुपये झाला असून, शुक्रवारी तो 1 लाख 40 हजार 900 रुपये होता. म्हणजेच 22 कॅरेट सोन्याच्या दरातही एका दिवसात 2,650 रुपयांची वाढ झाली आहे. चांदीच्या बाबतीतही मुंबई बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली असून, एक किलो चांदीचा दर शुक्रवारी 2 लाख 75 हजार रुपये असताना शनिवारी तो थेट 2 लाख 85 हजार रुपयांवर गेला आहे. म्हणजेच अवघ्या 24 तासांत चांदी तब्बल 10,000 रुपयांनी महागली आहे.

Gold Silver Price Today: दरांमध्ये चढ-उतार सुरू राहण्याची शक्यता 

आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी, डॉलरच्या तुलनेत रुपयातील चढ-उतार तसेच जागतिक आर्थिक घडामोडींचा परिणाम यामुळे सोने–चांदीचे दर वाढत असल्याचे सराफ बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहे. आगामी काळातही दरांमध्ये चढ-उतार सुरू राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

Gold Silver Price Today: प्रमुख शहरातील सोन्याचे दर

दरम्यान, देशातील सराफ बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. आज जाहीर झालेल्या दरांनुसार देशातील प्रमुख महानगरांमध्ये 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे दर वाढले आहेत.  

मुंबई, पुणे

24 Carat : 1,56,600

22 Carat : 1,43,550

दिल्ली

24 Carat : 1,56,750

22 Carat : 1,43,700

चेन्नई

24 कॅरेट : 1,57,310

22 कॅरेट : 1,44,200

कोलकाता

24 कॅरेट : 1,56,600

22 कॅरेट : 1,43,550

अहमदाबाद

24 कॅरेट : 1,56,650

22 कॅरेट : 1,43,600

बेंगळुरू

24 कॅरेट : 1,56,600

22 कॅरेट : 1,43,550

हैदराबाद

24 कॅरेट : 1,56,600

22 कॅरेट : 1,43,550

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Multibagger Stock : थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल, जाणून घ्या

देशात सोन्या चांदीसह अन्नधान्याच्या किंमतीत नेमकी का होतेय वाढ? RBI ने सांगितलं कारण