Gold Rate and Silver Rate Today : अमेरिका-इस्रायल-इराण (Iran Israel War) यांच्यातील युद्धाचा आजचा (13 मार्च)14 वा दिवस आहे. तरसध्या दोन्ही बाजूंकडून हल्ले सातत्याने अधिक तीव्र होत आहेत. इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्धामुळे सध्या पश्चिम आखाती देशांमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. याचे थेट पडसाद जागतिक पातळीवर उमटताना दिसत आहेत. आखाती देशांमधून जगातील अनेक देशांना खनिज तेलाचा (Crude Oil) पुरवठा होतो. मात्र, सध्या इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल (America vs Israel War) यांच्यातील युद्धामुळे खनिज तेलाच्या पुरवठ्यात काहीसा खंड पडला आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर अन्य घटकांवर याचा परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे.  अशातच, आज शुक्रवार, 13 मार्च रोजी देशांतर्गत वायदा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत थोडीशी घसरण दिसून येत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर 2 एप्रिल 2026 रोजी एक्सपायरी डेट असलेल्या सोन्याच्या वायदा अंदाजे ₹172 ने घसरल्या होत्या.

MCX वर सोन्याचा वायदा ₹160,251 प्रति 10 ग्रॅमवर ​​उघडला. मागील व्यापार दिवशी सोने ₹1,60,271 वर बंद झाले. सकाळी 10.30 वाजता, सोन्याचे वायदे 0.11 टक्क्यांनी घसरून ₹1,60,099 वर व्यवहार करत होते. सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याचे वायदे ₹1,60,401 च्या उच्चांकावर पोहोचले होते. अशातचआता तुमच्या शहरातील सोने आणि चांदीची सध्याची किंमत जाणून घेऊया.

Silver Rate Today : चांदीची प्रति ग्रॅम किंमत काय?

एमसीएक्सवर 5 मे 2026 रोजी एक्सपायरी असलेली चांदी 0.21 टक्क्यांनी घसरून ₹2,67,397 प्रति किलोवर व्यवहार करत होती. चांदीचा व्यवहार दिवस ₹2,66, 01 वर सुरू झाला होता. दिवसाचा उच्चांक ₹2,69,186 होता. दिल्ली आणि कोलकातामध्ये आज 10 ग्रॅम चांदी 2,800 रुपयांना विकली जात आहे. 100 ग्रॅम चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 28,000 रुपये खर्च करावे लागतील. चेन्नईमध्ये 10 ग्रॅम चांदीची किंमत 2,900 रुपये आहे आणि मुंबईत 10 ग्रॅम चांदीची किंमत 2,799 रुपये आहे.

तुमच्या शहरातील सोन्याचा भाव (गुडरिटर्न्सनुसार)

दिल्लीमध्ये सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट - ₹१,६१,३९०

२२ कॅरेट - ₹१,४७,९३०

१८ कॅरेट - ₹१,२१,०८०

मुंबईमध्ये सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट - ₹१,६१,२४०

२२ कॅरेट - ₹१,४७,८००

१८ कॅरेट - ₹१,२०,९३०

चेन्नईमध्ये सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट - ₹१,६२,५६०

२२ कॅरेट - ₹१,४९,०००

१८ कॅरेट - ₹१,२५,५००

कोलकातामध्ये सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट - ₹१,६१,२४०

२२ कॅरेट - ₹१,४७,८००

१८ कॅरेट - ₹१,२०,९३०

अहमदाबादमध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट - ₹१,६१,२९०

२२ कॅरेट - ₹१,४७,८३०

१८ कॅरेट - ₹१,२०,९८०

लखनऊमध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट - ₹१,६१,३९०

२२ कॅरेट - ₹१,४७,९३०

१८ कॅरेट - ₹१,२१,०८०

पाटण्यामध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट - ₹१,६१,२९०

२२ कॅरेट - ₹१,४७,८३०

१८ कॅरेट - ₹१,२०,९८०

हैदराबादमध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट - ₹१,६१,२४०

२२ कॅरेट - ₹१,४७,८००

१८ कॅरेट - ₹१,२०,९३०

हे देखील वाचा: