Gold-Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीचे दर कोसळले; चांदी 1300 रुपयांनी स्वस्त, पाहा आपल्या शहरातील सोन्याचा भाव
Gold-Silver Price Today: आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ५ जून २०२६ एक्सपायरी असलेला गोल्ड फ्युचर सुमारे ६५० रुपयांनी घसरून व्यवहार करत होता.

Gold-Silver Price Today: आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण पाहायला मिळत आहे. आज (शुक्रवारी, १० एप्रिल) रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) आणि सराफा बाजारात दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत नरमाई दिसून आली. सकाळच्या सत्रात ५ जून २०२६ च्या एक्सपायरी असलेले सोन्याचे वायदा दर सुमारे ६५० रुपयांच्या घसरणीसह व्यवहार करत होते. एमसीएक्सवर सोने १,५२,६८५ रुपये (प्रति १० ग्रॅम) या स्तरावर उघडले. सकाळी ९:५५ च्या सुमारास सोन्याचा भाव १,५२,७८३ रुपयांवर आला होता, जो मागील बंद किमतीपेक्षा (१,५३,४३४ रुपये) ०.४२ टक्क्यांनी कमी आहे.
Gold-Silver Price Today: चांदीमध्ये १३०० रुपयांची मोठी घट
चांदीच्या किमतीत आज मोठी घसरण झाली आहे. एमसीएक्सवर चांदीचा ५ मे २०२६ चा वायदा दर ०.५३ टक्क्यांनी किंवा १३०० रुपयांनी घसरून व्यापार करत आहे. चांदीने दिवसाची सुरुवात २,४२,५१५ रुपयांवर केली होती. दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे १० ग्रॅम चांदीचा दर २,६०० रुपये, तर १०० ग्रॅमसाठी २६,००० रुपये मोजावे लागत आहेत. आज (शुक्रवार, १० एप्रिल) रोजी सोने-चांदीच्या किमतीत घसरण पाहायला मिळत आहे. देशांतर्गत फ्युचर मार्केटमध्ये सोने चांदीच्या दरामध्ये सुरुवातीपासूनच घसरण दिसून आली आहे.
आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ५ जून २०२६ एक्सपायरी असलेला गोल्ड फ्युचर सुमारे ६५० रुपयांनी घसरून व्यवहार करत होता. एमसीएक्सवर सोने १,५२,६८५ रुपये (प्रति १० ग्रॅम) या दराने उघडले. मागील सत्रात सोने १,५३,४३४ रुपयांवर बंद झाले होते. सकाळी सुमारे 10 वाजता गोल्ड फ्युचर ०.४२ टक्क्यांच्या घसरणीसह १,५२,७८३ रुपयांवर व्यवहार करत होता. सुरुवातीच्या सत्रात सोने १,५२,९८५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले होते.
Gold-Silver Price Today: चांदीचे दर
एमसीएक्सवर ५ मे २०२६ एक्सपायरी असलेली चांदी ०.५३ टक्के म्हणजेच सुमारे १,३०० रुपयांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे. चांदीने दिवसाची सुरुवात २,४२,५१५ रुपयांपासून केली होती, तर दिवसातील उच्चांकी पातळी २,४२,९५४ रुपये इतकी नोंदवली गेली.
दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे १० ग्रॅम चांदीचा दर २,६०० रुपये आहे. १०० ग्रॅम चांदीसाठी २६,००० रुपये मोजावे लागत आहेत. चेन्नईमध्ये १० ग्रॅम चांदीचा दर २,६५० रुपये आहे.
Gold-Silver Price Today: वेगवेगळ्या शहरांतील सोन्याचे दर
दिल्ली
२४ कॅरेट – १,५१,६२० रुपये
२२ कॅरेट – १,३८,९९० रुपये
१८ कॅरेट – १,१३,७५० रुपये
मुंबई
२४ कॅरेट – १,५३,००० रुपये
२२ कॅरेट – १,४०,२५० रुपये
१८ कॅरेट – १,१४,७५० रुपये
चेन्नई
२४ कॅरेट – १,५२,७२० रुपये
२२ कॅरेट – १,३९,९९० रुपये
१८ कॅरेट – १,१६,४९० रुपये
कोलकाता
२४ कॅरेट – १,५३,००० रुपये
२२ कॅरेट – १,४०,२५० रुपये
१८ कॅरेट – १,१४,७५० रुपये
अहमदाबाद
२४ कॅरेट – १,५३,०५० रुपये
२२ कॅरेट – १,४०,३०० रुपये
१८ कॅरेट – १,१४,८०० रुपये
लखनऊ
२४ कॅरेट – १,५३,१५० रुपये
२२ कॅरेट – १,४०,४०० रुपये
१८ कॅरेट – १,१४,९०० रुपये
पटना
२४ कॅरेट – १,५३,०५० रुपये
२२ कॅरेट – १,४०,३०० रुपये
१८ कॅरेट – १,१४,८०० रुपये
हैदराबाद
२४ कॅरेट – १,५३,००० रुपये
२२ कॅरेट – १,४०,२५० रुपये
१८ कॅरेट – १,१४,७५० रुपये
महत्त्वाच्या बातम्या




















