Gold Silver Price Today: देशातील सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात (Gold-Silver Price) पुन्हा एकदा मोठी तेजी पाहायला मिळत आहे. शनिवार, 19 सप्टेंबर 2026 रोजी 24 कॅरेट सोन्याचा (24 Carat Gold) दर प्रति 10 ग्रॅम 1.54 लाख रुपयांच्या पुढे गेला आहे. दुसरीकडे 22 कॅरेट सोन्याचाही भाव 1.44 लाख रुपयांच्या आसपास पोहोचला आहे. सोन्यासोबतच चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली असून चांदीचा सरासरी भाव 2.50 लाख रुपये प्रति किलोच्या आसपास आहे.

Continues below advertisement

दिल्लीमध्ये शुक्रवारी सोन्याच्या दरात तब्बल 1,600 रुपयांची वाढ झाली. त्यानंतर 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,54,580 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,44,850 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्यामुळे लग्नसराई आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खर्चात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

Gold Price Today: प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे आजचे दर

शहर24 कॅरेट सोने (10 ग्रॅम)22 कॅरेट सोने (10 ग्रॅम)
दिल्ली1,54,580 रुपये1,44,850 रुपये
मुंबई1,54,430 रुपये1,44,350 रुपये
बेंगळुरू1,54,420 रुपये1,44,300 रुपये
चेन्नई1,54,430 रुपये1,41,560 रुपये

Silver Price Today: चांदीच्या दरातही मोठी तेजी

सोन्यासोबतच चांदीच्या दरातही (Silver Rate) मोठी वाढ झाली आहे. चांदीचा सरासरी भाव सध्या 2,50,100 रुपये प्रति किलोच्या आसपास आहे. दरम्यान, वायदा बाजारात चांदीच्या दरातही तेजी दिसून आली. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) डिसेंबर डिलिव्हरीच्या चांदीच्या करारात 1.25 टक्क्यांची वाढ झाली. चांदीचा भाव 2,41,183 रुपये प्रति किलो या पातळीवर पोहोचला. या व्यवहारात 3,082 लॉट्सची उलाढाल झाली. पीटीआयच्या वृत्तानुसार, बाजार विश्लेषकांच्या मते देशांतर्गत बाजारात चांदीची मागणी मजबूत असल्याने व्यापाऱ्यांकडून नव्या सौद्यांची खरेदी करण्यात आली. त्यामुळे चांदीच्या वायदा दरांना आधार मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारातही चांदीच्या दरात वाढ झाली आहे. न्यूयॉर्कमध्ये चांदीचा भाव 2.39 टक्क्यांनी वाढून 66.78 डॉलर प्रति औंस झाला.

Continues below advertisement

Gold Price: सोन्याच्या दरात सातत्याने वाढ का होत आहे?

जागतिक बाजारातील वाढती अनिश्चितता हे सोन्याच्या दरातील तेजीमागील महत्त्वाचे कारण मानले जात आहे. मध्यपूर्वेतील तणाव, तेल रिफायनरी आणि पाइपलाइनवरील हल्ले तसेच जागतिक टॅरिफबाबत सुरू असलेली अनिश्चितता यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जागतिक पातळीवर आर्थिक आणि भूराजकीय जोखीम वाढली की गुंतवणूकदार तुलनेने सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सोन्याकडे वळतात. त्यामुळे सोन्याची मागणी वाढते आणि त्याचा परिणाम दरावर होतो.

Gold Price: केंद्रीय बँकांकडून सोन्याची खरेदी

जगभरातील केंद्रीय बँकांकडून सोन्याची खरेदी सुरू असल्याचाही सोन्याच्या दराला आधार मिळत आहे. भारताची रिझर्व्ह बँक, चीनसह विविध देशांच्या केंद्रीय बँका आपल्या परकीय चलनाच्या साठ्यात सोन्याचा वाटा वाढवत आहेत. अमेरिकन डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्याच्या प्रयत्नांचाही यामध्ये समावेश आहे. त्यामुळे जागतिक बाजारात सोन्याची मागणी कायम राहण्यास मदत होत असून त्याचा परिणाम किमतींवर दिसून येत आहे. दरम्यान, सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये दिवसभरात आणि शहरानुसार बदल होऊ शकतात. त्यामुळे प्रत्यक्ष खरेदीपूर्वी स्थानिक सराफा बाजारातील ताजे दर तपासणे महत्त्वाचे आहे.

आणखी वाचा 

ट्रम्पकडून 100 टक्के टॅरिफ कायद्याला मंजुरी; भारतासकट रशियन तेल खरेदी करणाऱ्या टाॅप 5 देशांना बोटांच्या तालावर नाचवण्याची तयारी, रशियाच्या संरक्षण क्षेत्रावरही निर्बंध