Gold Rate: देशांतर्गत कमोडिटी बाजारात आज संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे. एका बाजूला सोन्याच्या दरात पुन्हा मोठी उसळी दिसून आली, तर दुसऱ्या बाजूला चांदीच्या किमतीत (Gold-Silver Price Today) घसरण नोंदवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार (Gold-Silver Price Today) सुरू असून, गुंतवणूकदार आणि ग्राहकांचे लक्ष पुन्हा बाजाराकडे लागले आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर जून डिलिव्हरीचे सोने आज ०.१७ टक्क्यांच्या वाढीसह सुमारे १ लाख ५९ हजार ६७४ रुपये प्रति १० ग्रॅम या स्तरावर व्यवहार करत होते. सुरुवातीच्या सत्रात सोन्याने १ लाख ५९ हजार ८९९ रुपयांपर्यंत मजल मारली होती. सोमवारीच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात किरकोळ वाढ दिसून आली आहे.(Gold-Silver Price Today)
दुसरीकडे, चांदीच्या दरात आज नफावसुलीचा परिणाम दिसून आला. MCX वर जुलै करारातील चांदी सुमारे ०.६५ टक्क्यांनी म्हणजेच जवळपास १,८०० रुपये प्रति किलोने घसरून २ लाख ७५ हजार ८२४ रुपये प्रति किलो या स्तरावर पोहोचली. मागील सत्रात चांदीचा दर २ लाख ७६ हजार ६५१ रुपये होता.(Gold-Silver Price Today)
Gold-Silver Price Today : शहरनिहाय आजचे सोने-चांदीचे दर
नवी दिल्ली२२ कॅरेट सोने : ₹१,४६,१५३२४ कॅरेट सोने : ₹१,५९,४४०चांदी : ₹२,७३,२७० प्रति किलो
मुंबई२२ कॅरेट सोने : ₹१,४६,४०१२४ कॅरेट सोने : ₹१,५९,७१०चांदी : ₹२,७३,७४० प्रति किलो
कोलकाता२२ कॅरेट सोने : ₹१,४६,२०८२४ कॅरेट सोने : ₹१,५९,५००चांदी : ₹२,७३,३८० प्रति किलो
चेन्नई२२ कॅरेट सोने : ₹१,४७,४४९२४ कॅरेट सोने : ₹१,६०,०९०चांदी : ₹२,७४,३०० प्रति किलो
बेंगळुरू२२ कॅरेट सोने : ₹१,४६,५२०२४ कॅरेट सोने : ₹१,५९,८४०चांदी : ₹२,७३,९५० प्रति किलो
हैदराबाद२२ कॅरेट सोने : ₹१,४६,६३९२४ कॅरेट सोने : ₹१,५९,९७०चांदी : ₹२,७४,१७० प्रति किलो
लखनऊ२२ कॅरेट सोने : ₹१,४३,३५०२४ कॅरेट सोने : ₹१,५६,३७०चांदी : ₹२,७३,५०० प्रति किलो
पुणे२२ कॅरेट सोने : ₹१,४३,२००२४ कॅरेट सोने : ₹१,५६,२२०चांदी : ₹२,९०,१०० प्रति किलो
केरळ२२ कॅरेट सोने : ₹१,४३,२००२४ कॅरेट सोने : ₹१,५६,२२०चांदी : ₹२,८०,००० प्रति किलो
तज्ज्ञांच्या मते, जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक परिस्थिती पाहता दीर्घकालीन कालावधीत सोन्याच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र अल्पकालीन कालावधीत चढ-उतार कायम राहू शकतात. बाजार विश्लेषकांच्या मते, एकरकमी मोठी गुंतवणूक करण्याऐवजी दर घसरल्यावर टप्प्याटप्प्याने सोने खरेदी करणे ही अधिक सुरक्षित आणि फायदेशीर रणनीती ठरू शकते.
Gold-Silver Price Today: सोन्याचे भाव आणखी वाढणार का?
जागतिक आणि देशांतर्गत बाजारातील सध्याची परिस्थिती पाहता, दीर्घकाळाचा (लॉन्ग टर्म) विचार केल्यास सोन्याचे भाव वाढण्याची दाट शक्यता आहे. मात्र, अल्पकाळासाठी (शॉर्ट टर्म) बाजारात चढ-उतार आणि तात्पुरती घसरण पाहायला मिळू शकते. प्रमुख जागतिक वित्तीय संस्था आणि आर्थिक विश्लेषकांच्या मते, वर्ष २०२६ च्या अखेरपर्यंत सोन्याच्या किमती एक नवा विक्रम प्रस्थापित करू शकतात.
तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, सोन्यामध्ये एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवण्याऐवजी 'बाय ऑन डिप्स' (Buy on Dips) म्हणजेच जेव्हा जेव्हा बाजारात घसरण होईल किंवा सोन्याची किंमत थोडे खाली येतील, तेव्हा टप्प्याटप्प्याने खरेदी करण्याची रणनीती आखली पाहिजे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हे अत्यंत सुरक्षित आणि फायदेशीर ठरेल.
