Gold Silver Price Today: सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज, 15 सप्टेंबर रोजी देशातील सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे, तर चांदीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. सोन्याचा भाव (Gold Price) 500 रुपयांनी कमी होऊन 1,55,400 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. दुसरीकडे, चांदीचा दर (Silver Price) 2,34,600 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिर आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी चांदीच्या दरात घट न झाल्याने ग्राहकांना चांदी स्वस्त होण्याची प्रतीक्षा कायम आहे.

Continues below advertisement

Gold Price Today: सोन्याच्या दरात 500 रुपयांची घसरण

आज सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या किमतीत (Gold Price) 500 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे सोन्याचा दर 1,55,400 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. मागील सत्रात म्हणजेच 14 सप्टेंबर रोजी हेच सोने 1,55,900 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. त्याच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात 500 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांत सोन्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरच्या किमतीतील बदल, कच्च्या तेलाचे दर आणि जागतिक आर्थिक परिस्थिती यांचा सोन्याच्या भावावर परिणाम होत असतो. आजच्या घसरणीमागे जागतिक बाजारातील विक्रीचा दबावहे एक प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे.

Continues below advertisement

Silver Price Today: चांदीच्या दरात कोणताही बदल नाही

सोन्याच्या किमतीत घट झाली असली, तरी चांदीच्या दरात (Silver Price) आज कोणताही बदल झालेला नाही. देशभरात चांदीचा भाव 2,34,600 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिर आहे. त्यामुळे चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आज ना फायदा मिळाला आहे, ना दरवाढीचा अतिरिक्त फटका बसला आहे. सणासुदीचा काळ आणि लग्नसराईचा हंगाम लक्षात घेता सोने-चांदीच्या दराकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे. दिवाळीच्या काळात चांदीची नाणी, दागिने आणि चांदीची भांडी खरेदी करण्याची परंपरा आहे. त्यामुळे चांदीच्या किमतीत भविष्यात काय बदल होतात, हे ग्राहकांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

Gold Silver Price: आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीची स्थिती काय?

जागतिक बाजारातही आज सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाल्याचे दिसून आले. उपलब्ध माहितीनुसार, स्पॉट गोल्ड (Spot Gold Price) 57.22 डॉलर म्हणजेच 1.3 टक्क्यांनी घसरून 4,291.71 डॉलर प्रति औंसवर आला आहे. त्याचप्रमाणे, चांदीच्या दरातही जवळपास 3 टक्क्यांची घट झाली असून, चांदीचा भाव 62.82 डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे. जागतिक बाजारातील या घसरणीमागे कच्च्या तेलाच्या किमती आणि डॉलरमधील तेजी यांचा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने महागाईबाबतची चिंता वाढते. त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि मौल्यवान धातूंच्या मागणीवर होऊ शकतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा परिणाम देशांतर्गत सोने-चांदीच्या दरांवरही होत असतो.

आणखी वाचा 

NSE IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करताय? सबस्क्रिप्शनपूर्वी या 5 महत्त्वाच्या गोष्टी नक्की पाहा