Gold Silver Price Prediction : सोनंचांदीखरेदी करणाऱ्यांसाठीकाहीशीचिंतावाढवणारीबातमीसमोरआलीआहे. कारणआगामीकाळात सोन्याचा भाव(Gold Price) प्रति 10 ग्रॅम 3 लाख रुपयांपेक्षा जास्त आणि चांदीचा भाव (Silver Rate) प्रति किलोग्रॅम 6 लाख रुपयांपेक्षा अधिकहोऊ शकतो, असाअंदाजआहे. हे धक्कादायक भाकीत अमेरिकेच्या गगनाला भिडणाऱ्या राष्ट्रीय कर्जाशी संबंधित आहे. त्यांनी असा इशारा दिला आहे की अमेरिकेचे राष्ट्रीय कर्ज लवकरच 40 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते. असादावा 'रिच डॅड, पुअर डॅड' या लोकप्रिय पुस्तकाचे लेखक आणि गुंतवणूकदार रॉबर्ट कियोसाकी यांनी केलाआहे. कियोसाकी यांच्या मते, या ऑगस्ट महिन्यात सोने की चांदी, यापैकी कोणता पर्याय योग्य ठरेल यावरही त्यांनीभाष्यकेलंआहे. (Gold Silver Price Prediction)

Continues below advertisement

Gold Price Prediction: आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस 10,000 डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतो

देशभरातआगामीकाळातसणासुदीचेदिवसअसूनयाकाळातसोनं-चांदीखरेदीकरण्याचानागरिकांचाकलअसतो. असताच रॉबर्ट कियोसाकी यांनी केलेल्यादाव्यानंसोन-चांदीखरेदीचाविचार करण्यांमध्येकाहीशीचिंतावाढलीआहे. एका ईमेल पोस्टमध्ये कियोसाकी यांनी लिहिले आहे की, त्यांचे जवळचे मित्र आणि प्रसिद्ध आर्थिक भाष्यकार, जिम रिकार्ड्स यांच्या अंदाजानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस 10,000 डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतो. चांदीचा भावही प्रति औंस 200 डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतो. एका औंसमध्ये 31.1035 ग्रॅम सोने असते. भारतीय बाजाराच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास, सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम सुमारे ₹3.06 लाख आणि चांदीचा भाव प्रति किलोग्रॅम सुमारे ₹6.13 लाख असू शकतो.

Continues below advertisement

Silver Rate: चांदीच्या भावात मोठी वाढ, गुंतवणूकदारांना महत्वाचासल्ला

रॉबर्ट कियोसाकी यांनी सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे, पण त्याचबरोबर त्यांनी गुंतवणूकदारांना या महिन्यात चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्लाही दिला आहे. 'एक्स'वर शेअर केलेल्या आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ऑगस्ट 2026 च्या सध्याच्या परिस्थितीत, ते चांदीला सोन्यापेक्षा एक चांगला आणि अधिक परतावा देणारा पर्याय मानतात.

कियोसाकी यांनी फियाट चलन बाळगणाऱ्यांना पुन्हा एकदा इशारा दिला आहे. त्यांनी पुनरुच्चार केला की, महागाई आणि अनियंत्रित चलन छपाईच्या युगात, जे लोक रोख रक्कम साठवून ठेवतात, त्यांनाच अखेरीस सर्वात मोठे नुकसान सोसावे लागते. वाढते अमेरिकन कर्ज आणि घटती खरेदी शक्ती या पार्श्वभूमीवर, गुंतवणूकदार आपल्या कष्टाने कमावलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी कोणती ठोस पावले उचलत आहेत, असा प्रश्न त्यांनी विचारला.

Gold Silver Price: सोने आणि चांदीचे दर

दरम्यान, गेल्या 24 तासांत सद्यस्थितीतील स्थानिक बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ नोंदवली गेली आहे. सोने, सोन्याच्या दरात 24 तासांत तब्बल 4,500 रुपयांची वाढ झाली आहे. काल १५१,५०० रुपयांवर असलेले सोन्याचे दर आज थेट १५६,००० (१ लाख ५६ हजार) रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत. तर चांदीच्या दरातही ११,००० रुपयांची मोठी वाढ झाली आहे. काल २३०,००० रुपयांवर असलेले चांदीचे दर आज २४१,००० (२ लाख ४१ हजार) रुपयांवर पोहोचले आहेत.(Gold Silver Rate)  

इतर महत्वाच्या बातम्या