Gold-Silver Price Today : सण-उत्सवाच्या काळात सोनं खरेदीकडे लोकांचा कल असतो. दिवळीमध्ये सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. पण त्यापूर्वीच सोनं आणि चांदीच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. आधीच इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झालेला आहे. त्यात सोनं आणि चांदीच्या दरवाढीची भर पडली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या दरात आज 0.43 टक्के वाढ झाली आहे. MCX नुसार, गरुवारी सोन्याच्या दरांत 164 रुपयांनी वाढ होऊन प्रतितोळा 47 हजार 548 इतकं झालं आहे.
गुरुवारी सोनं आणि चांदीच्या दरांत वाढ पाहायला मिळाली. बुधवारी बाजार बंद होण्यापूर्वी सोन्याची किंमत प्रतितोळा 47 हजार 548 रुपये इतकी झाली होती. याशिवाय चांदी प्रति किलो 65,607 रुपये इतकी झाली आहे. ग्लोबल मार्केटमध्ये सोनं 0.1 टक्केंनी घसरुन 1,800 डॉलर प्रति औंस झालं आहे.
दिवाळीत सोनं महागणार?
मार्केट तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, दिवाळीपासून डिसेंबरपर्यंत सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ पाहायला मिळू शकते. यावेळी सोनं प्रतितोळा 57 हजार ते 60 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतं. याचवेळी चांदीची किंमतही मोठ्या प्रमाणात वाढू शकते. या कालावधीत चांदी प्रति किलो 76,000 ते 82,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते.
आपल्या शहरातील सोन्याचे दर कसे तपासाल?
आता तुम्ही घरबसल्या सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशननुसार, 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर तुम्हाला सोन्याच्या किंमती तुम्हाला मिळतील.
पेट्रोल-डिझेलच्या दरांचा नवा उच्चांक
सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. आज डिझेलच्या किमतींमध्ये 33 ते 37 पैशांची वाढ करण्यात आली आहे. तर पेट्रोलच्या दरांमध्ये 30 ते 35 पैशांची वाढ करण्यात आली आहे. देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीत 106.54 रुपये, तर डिझेलचे दर 95.27 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत 112.44 रुपये आणि डिझेलची किंमत 103.26 रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचे दर 107.11 रुपये, तर डिझेलचे दर 98.38 रुपये लिटर आहे. तर चेन्नईमध्येही पेट्रोल 103.61 रुपये लिटर आहे. तर डिझेल 99.59 रुपये लिटरनं विकण्यात येत आहे.