Gold Silver Price News : मागील तीन चार दिवसापासून सोने चांदीच्या दरात (Gold Silver Rate) घसरण सुरु होती. मात्र, आज सोन्याच्या घसरणीचा ट्रेंड संपला आहे. आज सोन्याच्या दरात (Gold Rate) पुन्हा वाढ झालीय. आज सोन्याच्या दरात 400 रुपयांची वाढ झालीय. सध्या सोनं 71,500 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे. जाणून घेऊयात कोणत्या शहरात सोन्याला किती दर आहे.
सोन्यासह चांदीच्या दरातही वाढ
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत घट झाली होती, मात्र शुक्रवारी सोन्या-चांदीच्या किमती वाढल्या आहेत. वायदे बाजारात सोने 200 रुपयांनी महागले असून तो 71,400 रुपयांच्या वर गेले आहे. चांदीच्या दरातही वाढ होत आहे. MCX वर सोनं 480 रुपयांनी महागले असून ते प्रतिकिलो चांदीचा दर हा 81,000 रुपयांवर गेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज MCX म्हणजेच फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. आज सोन्याच्या दरात 205 रुपयांची वाढ झाली असून, सोनं 71,419 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचलं आहे. गुरुवारी सोन्याचा दर हा 71,214 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होता. आज यामध्ये 210 रुपयांची वाढ झालीय.
प्रमुख शहरांमधील सोन्या-चांदीचे दर काय?
दिल्ली - 24 कॅरेट सोने 72,860 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 84,500 रुपये प्रति किलोग्रॅम .
कोलकाता - 24 कॅरेट सोने 72,710 रुपये, चांदी 84,500 रुपये प्रति किलो
चेन्नई - 24 कॅरेट सोने - 73,690 रुपये, चांदी 88,000 रुपये प्रति किलोग्रॅम
मुंबई - 24 कॅरेट सोने - 72,710 रुपये, चांदी 84,500 रुपये प्रति किलो
नोएडा - 24 कॅरेट सोने 72,860 रुपये, चांदी 84,500 रुपये किलो
लखनौ - 24 कॅरेट सोने 72,860 रुपये, चांदी 84,500 रुपये प्रति किलो
पाटणा - 24 कॅरेट सोने 72,760 रुपये, चांदी 84,500 रुपये किलो
जयपूर - 24 कॅरेट सोने 72,860 रुपये, चांदी 84,500 रुपये प्रति किलो
पुणे - 24 कॅरेट सोने 72,710 रुपये, चांदी 84,500 रुपये प्रति किलो
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ
परदेशी बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात, COMEX वर सोने जून फ्युचर्स 4.19 डॉलरने महाग झाले आहे. त्यामुळं सोन्याची खरेदी करणं परवडत नसल्याचे चित्र आहे.
सध्या लग्नसराईचे दिवस सुरुआहेत. अशात मोठ्या प्रमाणात सोनं आणि चांदीची खरेदी होत असते. मात्र, दिवसेंदिवस सोन्याच्या आणि चांदीच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं सोन्याची खरेदी करणं सर्वसामान्यांना परवडत नाही. सोनं खरेदी करावं की नको अशी स्थिती झाली आहे.
महत्वाच्या बातम्या: