Gold Silver Rate Hike: तब्बल सहा आठवड्यांनी सोने आणि चांदीच्या दरांत मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. अमेरिका इराण मधील युद्धाची तीव्रता वाढताच सोने चांदी दरात मोठी घसरण झाली होती, मात्र गेल्या दोन दिवसात अमेरिकेने इराणवरील हल्ले थांबविताच, सोने चांदीच्या दरात वाढ (Silver Rate Hike) झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या चोवीस तासांत सोन्याच्या दरात तीन हजार रुपयांची वाढ (Gold Price Hike) होऊन ते 145000 वरून 148000 वर गेले आहे, तर चांदीच्या दरात दहा हजार रुपयांची वाढ (Silver Price Hike) होऊन 2300000 वरून ते 2400000 वर गेले आहेत.
सुमारे सहा आठवडे टिकलेल्या मंदीच्या काळानंतर, सोने आणि चांदीच्या दरांनी पुन्हा उसळी घेतली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यानं 4,300 डॉलर्सचा टप्पा ओलांडलाय, तर चांदीचा भाव प्रति औंस 62 डॉलर्सच्यावर गेला आहे. देशांतर्गत वायदा बाजारात (मल्टी कमोडिटी एक्सचेंज - MCX) सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 4,500 रुपयांनी वाढलेत, तर चांदी प्रति किलो 7,200 रुपयांहून अधिक महाग झाली आहे.
सोन्याचे सध्याचे दर काय? (Gold Rate)
- 24K सोन्याचे दर : 14,733 रुपये प्रति ग्रॅम/ 1,47,330 रुपये प्रति 10 ग्रॅम
- 22K सोन्याचे दर : 13,505 रुपये प्रति ग्रॅम/ 1,35,050 रुपये प्रति 10 ग्रॅम
- 18K सोन्याचे दर: 11,050 रुपये प्रति ग्रॅम/ 1,10,500 रुपये प्रति 10 ग्रॅम
सोन्याच्या दरांत अचानक मोठी वाढ झाल्यानं सामान्य खरेदीदार आणि गुंतवणूकदारांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. ही तेजीच्या नव्या पर्वाची (Bull Run) सुरुवात आहे की, केवळ काही काळापुरती आलेली सुधारणा? आता सोनं आणि चांदी खरेदी करावी की, आणखी काही काळ वाट पाहावी? सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आगामी काळात सोनं आणि चांदीचे संभाव्य दर काय असू शकतात? असे अनेक प्रश्नांनी खरेदीदारांच्या मनात गर्दी केली आहे.
सोने खरेदी करताना काय काळजी घ्याल?
सोनं खरेदी करताना, सर्वात आधी त्यावर BIS हॉलमार्क आणि 6-अंकी HUID कोड असल्याची खात्री करा. तसेच, सोन्याची शुद्धता (कॅरेट) तपासा. सोने नेहमी वैध GST बिलासह खरेदी करा आणि 'मेकिंग चार्जेस' आणि इतर कोणत्याही छुप्या खर्चाबद्दल विचारणा करायला विसरू नका.
चांदी खरेदी करताना काय काळजी घ्याल?
चांदीचे दागिने खरेदी करतानाही त्याची शुद्धता तपासून पाहणं आवश्यक आहे. सोन्याप्रमाणेच चांदीचं मूल्यही तिच्या शुद्धतेवर अवलंबून असते. चांदी खरेदी करताना नेहमी अधिकृत बिल घ्या आणि त्यावर 'हॉलमार्क' असल्याची खात्री करा. तसेच, हे लक्षात ठेवा की, चांदीवरही घडणावळ आकारली जाते, त्यामुळे या बाबीची पूर्ण माहिती करून घेणं गरजेचं आहे.
