Gold Rate Today : सध्या सगळीकडे नवरात्रोत्सवाचा (Navratri 2022) उत्सव सुरु आहे. नवरात्रीनंतर 5 ऑक्टोबरला दहाव्या दिवशी दसरा (Dussehra 2022) सण आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक सण असल्यामुळे या निमित्ताने सोने-चांदी, तसेच नवीन वस्तू खरेदी करणं आलंच. भारतीय ग्राहक गुंतवणूक म्हणून सोन्याचे कॉईन्स (नाणी) खरेदी करण्याला प्राधान्य देतात. अशातच आज सोन्याचे चांदीचे दर (Gold-Silver Rate) काहीसे वाढले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो दरात 50 बेसिस पॉईंट्स (bps) ने वाढ केल्यानंतर, भारतातील सोन्याचे दर 22-कॅरेटसाठी प्रति 100 ग्रॅम 2,500 रुपयांनी वाढले आहेत. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.30 टक्क्यांनी घसरून 24 कॅरेट सोन्याचा दर 50,160 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 56,790 रुपये आहे. 

तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर : 

शहर सोने 1 किलो चांदीचा दर 
मुंबई  45,980 56,790
पुणे 45,980 56,790
नाशिक  45,980 56,790
नागपूर 45,980 56,790
दिल्ली 45,898 56,690
कोलकाता  45,916 56,720

जागतिक बाजारपेठेतील सोन्या-चांदीचे दर : 

स्पॉट गोल्ड 0110 GMT नुसार 0.2 टक्क्यांनी वाढून $1,663.79 प्रति औंस झाला. किमती सात मधील त्यांच्या सर्वात मोठ्या साप्ताहिक नफ्याकडे जात असताना, आतापर्यंतच्या महिन्यासाठी ते 2.8 टक्क्यांनी खाली आले आहे. यूएस सोन्याचे फ्युचर्स 0.3 टक्क्यांनी वाढून $1,673.10 वर पोहोचले. स्पॉट सिल्व्हर 0.2 टक्क्यांनी वाढून $18.86 प्रति औंस, प्लॅटिनम $865.46 वर स्थिर होते आणि पॅलेडियम 0.5 टक्क्यांनी वाढून $2,211.59 वर होते.

तुमच्या शहराचे दर तपासा (Check Gold Rate In Your City) : 

ग्राहक आता घरी बसूनसुद्धा आजचे सोन्याचे दर तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन सोन्याची किंमत तपासू शकता. मात्र, लक्षात ठेवा तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल. 

महत्वाच्या बातम्या :