Gold Price Today नवी दिल्ली : देशांतर्गत फ्यूचर मार्केटमध्ये बुधवारी म्हणजेच 10 डिसेंबरला सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 5 फेब्रुवारी 2026 च्या एक्सपायरीच्या गोल्ड फ्यूचरचा वायदा 130090 रुपयांवर सुरु झाला. बाजार संपताना मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच दर 130107 रुपयांवर ट्रेड होत बंद झालं.  

Continues below advertisement

10 डिसेंबरला 10:10 वाजता मल्टी कमोडिटी एक्सचेंजच्या 5 फेब्रुवारीच्या एक्सपायरीच्या सोन्याचे दर 130090 रुपयांवर ट्रेड करत होता. ज्यामध्ये कालच्या तुलनेत 15 रुपयांची घसरण पाहायला मिळाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सुरुवातीच्या सत्रात सोनं 130502 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला होता.  

Gold Rate in Mumbai तुमच्या शहरातील सोन्याचे दर (गुड रिटर्ननुसार) 

दिल्लीतील सोन्याचे दर  (प्रति 10 ग्रॅम)

Continues below advertisement

24 कॅरेट - 1,30,460 रुपये 22 कॅरेट - 1,19,600 रुपये 18 कॅरेट - 97,880 रुपये

मुंबईतील सोन्याचे दर  (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट - 1,30,310 रुपये 22 कॅरेट - 1,19,450 रुपये 18 कॅरेट - 97,730 रुपये

चेन्नईतील सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट - 1,31,240 रुपये 22 कॅरेट - 1,20,300 रुपये 18 कॅरेट - 1,00,300 रुपये

कोलकाता येथील सोन्याचे दर  (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट - 1,30,310 रुपये22 कॅरेट - 1,19,450 रुपये 18 कॅरेट - 97,730 रुपये

अहमदाबादमधील सोन्याचे दर  (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट - 1,30,360 रुपये 22 कॅरेट - 1,19,500 रुपये 18 कॅरेट - 97,780 रुपये

लखनौ मधील सोन्याचे दर  (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट - 1,30,460 रुपये 22 कॅरेट - 1,19,600 रुपये 18 कॅरेट - 97,880 रुपये

पाटणा येथील सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट - 1,30,360 रुपये 22 कॅरेट - 1,19,500 रुपये 18 कॅरेट - 97,780 रुपये

हैदराबादमधील सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट - 1,30,310 रुपये22 कॅरेट - 1,19,450 रुपये 18 कॅरेट - 97,730 रुपये

सोन्याच्या दरात सातत्यानं तेजी आणि घसरण सुरु असते. जगभरातील विविध घटानांचा प्रामुख्यानं युद्धजन्य परिस्थिती, रुपयाची कमजोर स्थिती, सरकारचा कर यामुळं सोन्याच्या दरावर परिणाम होत असतो. यामुळं सोन्याच्या दरात दररोज बदल होत असतो.  

सोन्याचेदर वाढले तरी भारतीय ग्राहक सोन्याची खरेदी करण्यास प्राधान्य देतात. सोने खरेदी करणं भारतीय नागरिकांकडून शुभ मानलं जातं. त्यामुळं भारतात सणांच्या काळात सोन्याची खरेदी केली जाते. लग्न सराईच्या काळात सोन्याची मागणी अधिक वाढते. या दरम्यान सोने खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते. 2025 मध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. 31 डिसेंबर 2024 ला 24 कॅरेट सोन्याचे दर 75 हजारांवर होते. सध्या 24 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 30 हजारांवर पोहोचला आहे. म्हणजेच सोन्याच्या दरात 55 हजार रुपयांची वाढ झाली आहे.