Gold Rate Today : पुढील महिन्यापासून लग्नसराईचा हंगाम सुरू होणार आहे. सणासुदीच्या काळात किंवा लग्न सोहळ्याच्या निमित्ताने सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या तयारीत असलेल्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. तसेच जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तर तुमच्यासाठी चांगले दिवस आले आहेत. कारण आता तुम्हाला पूर्वीपेक्षा कमी पैसे खर्च करावे लागतील. कारण आजचे दर पाहता सोन्याचे भाव कमी झालेले दिसत आहेत. जाणून घ्या सविस्तर
देशातील 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याच्या किमती काय आहेत?जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर सोन्यात गुंतवणूक करणे चांगले ठरणार आहे, तसेच सोन्याचे दागिने खरेदी करायचे असतील, तर आजचे सोन्याचे दर जाणून घेणे महत्त्वाचे आहे, सोने खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला सर्व महत्त्वाची माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. देशातील 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याच्या किमती काय आहेत? देशातील सोन्याचा भाव रोज बदलत असतो. आज सर्व सोन्याच्या किमती अपडेट करण्यात आल्या आहेत. आजचा सोन्याचा भाव जाणून घ्या
आज भारतातील प्रति ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत ग्रॅम आजचे 22 कॅरेट सोने (₹) काल 22 कॅरेट सोने (₹) दैनंदिन किंमत बदल (₹)1 ग्रॅम 5,259 5,389 -1308 ग्रॅम 42,072 43,112 -1,04010 ग्रॅम 52,590 53,890 -1,300100 ग्रॅम 525,900 538,900 -13,000
आज भारतातील प्रति ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत
ग्रॅम आजचे 24 कॅरेट सोने (₹) काल 24 कॅरेट सोने (₹) दैनंदिन किंमत बदल (₹)1 ग्रॅम 5,737 5,879 -1428 ग्रॅम 45,896 47,032 -1,13610 ग्रॅम 57,370 58,790 -1,420100 ग्रॅम 573,700 587,900 -14,200
आजचे भारतीय प्रमुख शहरातील सोन्याचे दर (10g)शहर आजचे 24 कॅरेट सोने आजचे 22 कॅरेट सोनेमुंबई 57,370 52,590पुणे 60847 55777चेन्नई 60110 55100हैदराबाद 59830 57475नवी दिल्ली 59121 59499बंगळुरू 59830 57470केरळ 62680 57456अहमदाबाद 62700 57475विजयवाडा 62700 57475कोईम्बतूर 62695 57470
22 कॅरेट आणि 24 कॅरेटसाठी अनुक्रमे ऐतिहासिक सोन्याचे दर खालीलप्रमाणे आहेत:
तारीख 22 कॅरेट (प्रति ग्रॅम) 24 कॅरेट (प्रति ग्रॅम)4-Oct-23 ₹5,259 ₹5,737 3-Oct-23 ₹5,320 ₹5,804 2-Oct-23 ₹5,389 ₹5,8791-Oct-23 ₹5,389 ₹5,879
भाव का कमी होत आहेत?अमेरिका आणि युरोपमध्ये आता महागाई कमी होऊ लागली आहे. 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर वाढलेला महागाईचा दर आता कमी होऊ लागला आहे. महागाई कमी झाल्यामुळं सोन्यातील गुंतवणूक कमी होत आहे. त्यामुळे इतर चलनांच्या तुलनेत डॉलर मजबूत होत आहे. येथून डॉलर आणखी मजबूत होईल, असा अंदाज आहे. त्यामुळेच डॉलरची मजबूती आणि सोन्याची मागणी घटल्याने सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे
महत्त्वाच्या बातम्या:
Jalgaon Gold Rate : पितृ पक्ष राहिला बाजूला, जळगावात सोने खरेदीसाठी झुंबड, दर पाहून तुम्हीही म्हणाल....