Gold Price Update नवी दिल्ली : अमेरिकेचे अर्थतज्ज्ञ आणि दिग्गज मार्केट रणनीतीकार एड यार्डेनी यांनी सोने दराबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. सोन्याचे दर या दशकाच्या शेवटपर्यंत मोठ्या प्रमाणात वाढू शकतील असा अंदाज यार्डेनी यांनी वर्तवला आहे. सीएनबीसी टीव्ही 18 रिपोर्टनुसार यार्डेनी रिसर्चचे अध्यक्ष एड यार्डेनी यांनी 2029 पर्यंत सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात 10 हजार डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचू शकतो.
एड यार्डेनी यांचा अंदाज Roaring 2020s नुसार अमेरिकन शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक एस अँड पी 500 निर्देशांक देखील उच्चांकावर पोहोचेल असा अंदाज व्यक्त केला.
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात न्यूयॉर्क येथील कॉमेक्सवर सोन्याचा दर 4400 डॉलर प्रति औंस इतका आहे. 222 डिसेंबरला सोन्याचे दर उच्चांकावर पोहोचले होते. या तेजीमागील कारण अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून आगामी काळातील व्याज दर कपातीची अपेक्षा आहे.
सोने गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय मानला जातो. डॉलर कमजोर होणं हा देखील सोने दरवाढी मागील फॅक्टर मानला जात आहे. 2025 मध्ये सोन्याचे दर 67 टक्क्यांनी वाढले आहेत.
सोनं 3 लाख रुपयांवर पोहोचणार?
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर 4410 डॉलर प्रति औंस आहे. सोन्याचे दर या दशकाच्या शेवटपर्यंत 10000 डॉलर प्रति औंसवर गेल्यास सोने दरातील तेजी 127 टक्के असू शकते. म्हणजेच सोन्याचे दर अडीच पट वाढू शकतात.
भारतीय बाजाराचा विचार केल्यास एमसीएक्सवर सोन्याचा दर 135890 रुपये आहेत. 2029 पर्यंत यात 127 टक्क्यांची तेजी आल्यास दर 3.08 लाख रुपये असेल.
यार्डेनी यांच्यामते सोन्यातील गुंतवणूक महत्त्वाची आहे. कारण, इतिहासात जेव्हा जेव्हा सोने दरात वाढ झाली आहे तेव्हा सोन्यानं गुंतवणूकदारांना अपेक्षेपेक्षा जादा परतावा दिला आहे.
यार्डेनी यांनी अमेरिकन शेअर बाजाराबद्दल देखील सकारात्मक अंदाज वर्तवला आहे. एस अँड पी 500 निर्देशांक 7700 पर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.
सोन्याचे आजचे दर
सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. चांदीच्या दरात 7214 रुपयांची वाढ झाली आहे. तर, सोन्याचे दर 1805 रुपयांनी वाढले आहेत. जीएसटीसह एक किलो चांदीचा दर 213776 रुपये झाला आहे. तर, 24 कॅरेट सोन्याचा दर 137591 रुपये प्रति तोळा झाला आहे. 2025 मध्ये सोन्याचा दर 57884 रुपयांनी वाढले आहेत, तर चांदीचे दर 121533 रुपयांनी वाढले आहेत.
23 कॅरेट सोन्याचा दर 1798 रुपयांनी वाढून 133049 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. जीएसटीसह याचा दर 137040 रुपये झाला आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर 1653 रुपयांनी वाढून 122363 रुपयांवर पोहोचला आहे. जीएसटीसह याचा दर 126033 रुपये झाला आहे.