सलग सहा दिवस सोन्याच्या दरात घसरण, आज मात्र सोन्या चांदीच्या दरानं दिला ग्राहकांना झटका, नेमकी किती झाली वाढ?
Gold Price News : सोन्याच्या दरानं ग्राहकांना मोठा झटका दिला आहे, आज सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
Gold Price News : गेल्या सहा दिवसापासून सोन्याच्या दारत (Gold Price) घसरण सुरु होती. हे ग्राहकांसाठी दिलासा देणारी गोष्ट होती. त्यांच्या खिशाला लागणारी अधिकची कात्री कमी झाली होती. मात्र, आज सातव्या दिवशी सोन्याच्या दरानं ग्राहकांना मोठा झटका दिला आहे, आज सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सोन्या चांदीच्या दरात नेमकी किती वाढ झाली ते पाहुयात.
आज 4 सप्टेंबर रोजी, सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ दिसून आली आहे. सलग सहा दिवसांपासून सुरू असलेली सोन्याच्या दरातील घसरण अखेर थांबली. राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात, 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव 3400 रुपयांनी वाढून प्रति 10 ग्रॅम 159500 रुपयांवर पोहोचला. चांदीचा भावही 5000 रुपयांनी वाढून प्रति किलोग्राम 240500 रुपयांवर पोहोचला आहे. या वाढत्या दरामुळं ग्राहकांच्या खिशाला कात्री लागली आहे.
चांदी किती महाग झाली?
सोन्यासोबत चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली. चांदीचा भाव 5000 ने वाढून 240500 प्रति किलोग्राम झाला. यापूर्वी, गुरुवारी चांदीचा भाव 235500 प्रति किलोग्रामवर बंद झाला होता. अलीकडील उच्चांकावरून यूएस बाँड यील्ड्स घसरल्याने सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ दिसून आली आहे. शिवाय, नव्याने निर्माण झालेल्या भू-राजकीय तणावामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून मौल्यवान धातूंची मागणी वाढली आहे. दरम्यान, वाढत्या दरामुळं ग्राहकांना मोठा फटका बसत आहे. सध्या सणासुदीचा काळ सुरु झाला आहे. या काळात ग्राहक मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीची खरेदी करत असतात. मात्र, आता सोन्या चांदीच्या दरात वाढ झाल्यानं खरेदीवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे.
काल सोने आणि चांदीच्या दरात मोठी कपात झाली होती
काल, 3 सप्टेंबर रोजी सोने आणि चांदीच्या दरात मोठी कपात झाली होती. या दोन्हींच्या दरातील हा महत्त्वपूर्ण बदल सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी होती. सध्या सणासुदीचा काळा आहे .या काळात मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीची खरेदी केली जाते. त्यामुळं काल दरात घसरण झाल्याचा फायदा ग्राहकांना झाला आहे. काल सोन्याची खरेदी करण्याची सुवर्ण संधी होती. आज दरात वाढ झाल्यानं ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.
अमेरिकेच्या चलनविषयक धोरणाचाही परिणाम
विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याच्या किंमतीतील ही सुधारणा अमेरिकेच्या चलनविषयक धोरणाबाबतच्या बाजारातील अपेक्षांमधील बदलांप्रति असलेली त्याची संवेदनशीलता दर्शवते. व्याजदर आणि अमेरिकन बाँड यील्ड्समधील बदलांचा सोन्याच्या किमतींवर अनेकदा परिणाम होतो.
महत्त्वाच्या बातम्या






















