Gold Price Hike : अमेरिकेतील मोठ्या बँका बुडल्याचा परिणाम भारतीय बाजारपेठेवरही दिसून येतोय. भारतात सोन्या-चांदीच्या दरात उच्चांकी वाढ झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange) सोन्याचा दर प्रति किलो 59,461 रूपयांंच्या उच्चांक पातळीवर पोहोचला आहे. या आठवड्यात सोन्याची किंमत तब्बल 1,414 रूपये प्रति 10 ग्रॅमने वाढली आहे. सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांनी मात्र खरेदीकडे पाठ फिरवली आहे.

  


गेल्या आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रादरम्यान, सोन्याच्या दराने 56,130 प्रति 10 ग्रॅमच्या तुलनेत सुमारे 5.86 टक्के साप्ताहिक वाढ नोंदवली. आंतरराष्ट्रीय स्पॉट मार्केटमध्ये सोन्याचा भाव 1,988.50 डॉलर प्रति औंसवर बंद झाला आणि मागील आठवड्याच्या 1,867 डॉलर प्रति औंसच्या तुलनेत 6.48 टक्क्यांनी साप्ताहिक वाढ नोंदवली.


सोन्याचे दर प्रति औंस $1,930 च्या वर आहेत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ते $2,000 प्रति औंसच्या पातळीला स्पर्श करणार आहेत. MCX वर, सोन्याचे दर 58,500 ते 59,461 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर व्यवहार करत आहेत. लवकरच हे दर वाढण्याची शक्यता असून हे दर 60,000 रूपये प्रति 10 ग्रॅम होण्याची अपेक्षा आहे.


दागिन्यांची शुद्धता कुठे तपासाल?


दरम्यान भारतात सुरक्षित गुंतवणूक म्हणून कायमच सोन्याकडे पाहिलं जातं. पण सोन्या-चांदीचे दर नेहमीच कमी-जास्त होत असतात. सकाळी पाहिलेले दर संध्याकाळपर्यंत सारखेच असतील याची खात्री देणं तसं कठीणच आहे. परंतु लग्नासाठी किंवा गुंतवणूक म्हणून देखील सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला ठरु शकतो. तुम्हाला जर दागिन्यांची शुद्धता तपासायची असेल तर तुम्ही BIS CARE APP द्वारे तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.


महत्त्वाच्या बातम्या : 


Gold Rate Today : 24 तास सोन्याचा दर एक हजार रुपयांना वधारला, जळगावच्या सुवर्णनगरीत जीएसटीसह तोळ्याचा दर...