Gold Price : सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. सोन्याच्या दरात (Gold Price) मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं खरेदी करणाऱ्यांना मोठी संधी आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) सोन्याचा भाव 2900 रुपयांनी घसरला आहे. त्यामुळं ही मोठी घसरण मानली जात आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. त्यामुळं सोन्याची मोठ्या प्रमामात खरेदी होत आहे. वधू वरांसाठी मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीची खरेदी होत आहे. त्यामुळं दरात देखील तेजी असल्याचं चित्र गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत होतं. मात्र, आता सोन्याच्या दरात तब्बल 2900 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळं 24 कॅरेट सोन्याचा भाव 76,190 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत घसरला आहे.
सोन्याची घसरण आणखी किती काळ सुरू राहणार?
सोन्याच्या दरात थोडीशी घसरण ही खरेदीदारांसाठी दिलासा देणारी बाब आहे. मात्र लग्नसराईच्या काळात ही घसरण आणखी किती काळ सुरू राहणार हा मोठा प्रश्न आहे. आत्ताच दागिने किंवा सोने खरेदी करा किंवा थोडा वेळ थांबा. सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांनाही हीच चिंता असते. तज्ज्ञांचा दावा आहे की लग्नसराईच्या हंगामामुळे भौतिक सोन्याची वाढती मागणी देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीला आधार देत आहे. म्हणजेच काही महिने सोन्याचे भाव फार कमी होण्याची वाट पाहू नका, असे स्पष्ट संकेत सोने बाजारातील तज्ज्ञ देत आहेत. लग्नसराईचा हंगाम पाहता सोन्याच्या भावात वाढ झाली असली तरी मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव 2900 रुपयांच्या विक्रमी पातळीच्या खाली आला आहे. सध्या सोन्याची किंमत 76,190 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. अमेरिकन डॉलरच्या वाढत्या किमतीमुळे सोन्याच्या किमतीवर दबाव वाढत आहे. त्यामुळे नजीकच्या काळात सोन्याच्या किमती अस्थिर राहण्याची अपेक्षा आहे.
सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक नागरिकांना फायद्याची ठरत आहे. कारण दिवसेंदिवस सोन्याचे दर वाढतच आहेत. यामुळं सोन्यात केलेली गुंतवणूक फायद्याची ठरत आहे. दुसऱ्या बाजदुला सर्वसामान्य लोकांना सोन्याची खरेदी करणं शक्य नाही. त्यामुळं सोन्याच्या किंमती कधी कमी होणार असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. दरम्यान, ज्या लोकांकडे मोठ्या प्रमाणात पैसा आहे ते लोक सोन्याची खरेदी करताना दिसत आहेत. कारण भविष्यकाळात ही गुंतवणूक फायद्याची ठरते.
महत्वाच्या बातम्या:
सराफा बाजारातील सोने खरेदीचा ट्रेंड बदलला, ग्राहक करतायेत 'या' नवीन पद्धतीचा अवलंब