Gold Silver Rate : सराफा बाजारात चांदीचे दर 19000 रुपयांनी वाढले, सोनं 4300 रुपयांनी महागलं, पुन्हा उच्चांक गाठला, जाणून घ्या नवे दर
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरानं शुक्रवारी पुन्हा उच्चांक गाठला आहे. चांदीचा दर 3.40 लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तर, सोन्याच्या दरात देखील तेजी पाहायला मिळत आहे.

नवी दिल्ली : सोने आणि चांदीच्या दरात गुरुवारी मोठी घसरण पाहायला मिळाली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज सोने आणि चांदीचे दर पुन्हा वाढले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने आणि चांदीच्या दरानं उच्चांक गाठला आहे. गुरुवारी चांदीचे दर 20 हजार रुपयांनी घसरले होते, सोन्याचे दर देखील 4000 रुपयांनी कमी झाले होते. सराफा बाजारात चांदीचे दर 19249 रुपयांनी वाढले तर सोन्याचे दर 4300 रुपयांनी वाढले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 5 मार्चला संपणाऱ्या वायद्याचे चांदीच्या दरात 13000 रुपयांची वाढ झाली आणि दर 339927 रुपये किलोवर पोहोचले होते. त्यानंतर दुपारी साडे बारा वाजता चांदीचे दर 7000 रुपयांच्या तेजीसह 334505 रुपयांवर पोहोचले आहेत.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे 5 फेब्रुवारीच्या वायद्याचे दर देखील 159226 रुपयांवर पोहोचले आहेत. सुरुवातीला सोन्याचे दर 3000 रुपयांनी वाढले होते. दुपारी साडे बारा वाजेपर्यंत सोन्याचे दर 1300 रुपयांच्या तेजीसह 157728 रुपयांवर होते.
सराफा बाजारात काय चित्र होतं?
सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा जोरदार तेजी पाहायला मिळाली. गुरुवारच्या तुलनेत सोन्याचे दर 4300 रुपयांनी वाढले आहेत. तर, चांदी 19249 रुपयांनी महागली आहे. जीएसटीसह चांदीचा दर 328528 रुपये किलो आहे. तर, 24 कॅरेट सोन्याचा जीएसटीसह दर 160090 रुपये झाला आहे.
जानेवारी महिन्यात सोन्याचे दर 88540 रुपयांनी महागले आहेत. सोन्याचे दर 22233 रुपयांनी वाढले आङेत. चांदीचा जीएसटीशिवायचा दर 318960 रुपये किलो आहे. तर, जीएसटीशिवाय सोन्याचा दर 155428 रुपये आहे. गुरुवारी चांदीचा जीएसटीशिवायचा दर 299711 रुपये होता. तर, सोन्याचा दर 151128 रुपये किलो होता.
सराफा बाजारात 23 कॅरेट सोन्याचे दर 4283 रुपयांनी वाढले असून ते 154806 रुपयांवर पोहोचले आहेत. जीएसटीसह एक तोळा सोन्याचा दर 159450 रुपये आहे. यामध्ये मेकिंग चार्जेसचा समावेश नाही.
22 कॅरेट सोन्याचा दर देखील 3939 रुपयांनी वाढला आहे. 22 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 142372 रुपये झाला आहे. जीएसटीसह याचा दर 146643 रुपये आहे.
18 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 3225 रुपयांनी वाढला असून तो 116571 रुपयांवर पोहोचला आहे. जीएसटीसह एक तोळे सोन्याचा दर 120068 रुपये आहे. तर, 14 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 2515 रुपयांनी वाढला असून तो 90925 रुपयांवर पोहोचला आहे.
सोने आणि चांदीचे दर वाढण्याचं कारण शेअर बाजारातील वाढती अस्थिरता हे आहे. शेअर बाजारात अस्थिरता निर्माण झाल्यास गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यात गुंतवणूक करतात. तर, चांदीचा औद्योगिक वापर वाढल्यानं दर वाढू लागले आहेत.
























