Israel-Hamas Conflict : इस्रायल आणि पॅलेस्टाईन (Israel Palestine Conflict) यांच्यातील संघर्ष चांगलाच पेटला आहे. इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासचे (Hamas) ऐकमेकांवर हल्ले सुरु आहेत. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे सोने चांदीची  मागणी आणि प्रीमियममध्ये तीव्र वाढ झाली आहे. यामुळं सोन्या-चांदीच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.  


इस्रायल आणि गाझामधील युद्धाचा परिणाम आता सोन्या-चांदीच्या बाजारावरही दिसून येत आहे. सध्या बाजारात सोन्याची मागणी झपाट्याने वाढली आहे. त्यामुळं सोन्या-चांदीचा प्रीमियम झपाट्याने वाढला आहे. सोन्याचा प्रीमियम प्रति 10 ग्रॅम 700 ते 2000 रुपयांनी वाढला आहे. पूर्वी ते 1 हजार 300 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. हा प्रीमियम इतका वेगाने वाढला आहे. काही ठिकाणी सराफा व्यापाऱ्यांना सोने विकण्यास नकार देण्यात आला आहे. तर चांदीचा प्रीमियम प्रति 1 किलोला 1000 रुपयांनी वाढून 3500 रुपये प्रति 1 किलो झाला आहे. पूर्वी 1 किलोमागे 2500 रुपये होते. सोने चांदीच्या प्रीमियममध्ये मोठी वाढ झाल्यानं सोने आणि चांदीच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.


सोन्या-चांदीची मागणीत झपाट्यानं वाढ


इस्रायलमधील युद्धानंतर सोन्या-चांदीची मागणी झपाट्याने वाढत आहे. दुसरीकडे, भारतात आता सणासुदीला सुरुवात होणार आहे. अशा स्थितीत भारतातही सोन्या चांदीच्या मागणीत झपाट्यानं वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं सोन्या-चांदीच्या दरातही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. अलीकडच्या काही दिवसात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. तसेच चांदीच्या दरातही चांगली घसरण झाली होती. त्यामुळं अनेक दुकानदार आणि गुंतवणूकदारांनी सोन्या-चांदीच्या खरेदीवर अधिक लक्ष केंद्रित केलं आहे. दुसरीकडं सोन्याची मागणी लक्षात घेता डीलर्स सध्या सोने-चांदीची विक्री करू इच्छित नाहीत.


आजचे सोन्या चांदीचे दर काय?


इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याची किंमत 56 हदार 539 रुपये, 22 कॅरेटची किंमत 51 हजार 790 रुपये आणि 18 कॅरेटची किंमत 42 हजार 404 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर चांदी 67 हजार 95 रुपये प्रति किलो आहे. भारतात, सोने आणि चांदीचा वापर दागिने, गुंतवणूक आणि सेंट्रल बँकेतील राखीव निधीद्वारे केला जातो. भारतात दरवर्षी 700 ते 800 टन सोन्याचा वापर होतो. त्यापैकी 1 टन सोने भारतातच तयार होते. तर बाकीचे सोने आयात केले जाते.


दरम्यान, पुढील महिन्यापासून लग्नसराईचा हंगाम सुरू होणार आहे. सणासुदीच्या काळात किंवा लग्न सोहळ्याच्या निमित्ताने सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या तयारीत असलेल्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त! लग्नसराई-सणासुदीसाठी सोने खरेदी करायचीय? सविस्तर जाणून घ्या