Gold rate Silver price: गेल्या काही दिवसांपासून इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्ध तात्पुरते थांबले असले तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर भांडवली बाजार, खनिज तेलाचे भाव आणि सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढउतार पाहायला मिळत आहेत. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु झाल्याने सोने (Gold Price) खरेदीचे प्रमाण वाढले आहे. परिणामी सोन्याच्या भावात वाढ पाहायला मिळत आहे. मंगळवारी जळगावातील सुवर्णनगरीत सोने व चांदीचा (Silver price) भाव वधारला. (Gold and Silver todays rate)
सोन्याच्या दरात 1 हजार 500 आणि चांदीच्या दरात 11 हजारांची वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे सोन्याचा प्रतितोळा भाव जीएसटीसह 1 लाख 56 हजार रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. तर एक किलो चांदीचा दर 2 लाख 59 हजार 600 रुपये इतका झाला आहे. येत्या काही दिवसांमध्ये अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya 2026) असल्याने सोन्याचा भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Gold-Silver Price : दैनंदिन वापरासाठी किती कॅरेटचे सोने सर्वात टिकाऊ?
सोन्याचे दागिने घालण्याची आवड महिलांसोबतच पुरुषांनाही असते. मात्र, दागिन्यांची खरेदी करताना अनेकदा आपला गोंधळ होतो की, रोजच्या वापरासाठी (Daily Wear) किती कॅरेटचे सोने निवडावे? सामान्यतः आपल्यासमोर १४-कॅरेट (14K) आणि १८-कॅरेट (18K) असे दोन मुख्य पर्याय असतात.
Gold Jewellery : दैनंदिन वापरासाठी कोणता पर्याय उत्तम?
शुद्ध सोने (२४-कॅरेट) अत्यंत मऊ असते, त्यामुळे ते सहज वाकू शकते किंवा तुटू शकते. म्हणूनच २४-कॅरेटचे दागिने रोज वापरण्यासाठी योग्य मानले जात नाहीत.
१४-कॅरेट (14K): हे सोने जास्त मजबूत आणि टिकाऊ असते. त्यामुळे अंगठ्या किंवा साखळी यांसारख्या रोज वापरल्या जाणाऱ्या दागिन्यांसाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे.
१८-कॅरेट (18K): हे दागिने दिसायला अधिक पिवळसर आणि उठावदार असतात. विशेष समारंभ किंवा स्टाईल दाखवण्यासाठी १८-कॅरेटचे दागिने अधिक उपयुक्त ठरतात.
Gold Jewellery : 'कॅरेट' म्हणजे नक्की काय?
दागिन्यांवर असलेले 14K किंवा 18K सारखे मार्क सोन्याची शुद्धता दर्शवतात. कॅरेटचा आकडा जेवढा जास्त, तेवढे सोने अधिक शुद्ध असते. मात्र, शुद्ध सोने अत्यंत लवचिक असल्याने त्याचा आकार लवकर बिघडू शकतो किंवा त्यावर ओरखडे (Scratches) पडू शकतात.
सोने मजबूत करण्यासाठी त्यात तांबे किंवा चांदी यांसारखे इतर धातू मिसळले जातात, ज्याला 'मिश्र धातू' (Alloy) म्हणतात. कॅरेट सिस्टम हेच सांगते की, त्या विशिष्ट दागिन्यात शुद्ध सोन्याचा किती हिस्सा आहे.
