Continues below advertisement

नवी दिल्ली : भारतीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात तेजी दिसून आली. चांदीचे दर 1619 रुपयांनी वाढले. तर सोन्याच्या दरात देखील 609 रुपयांची वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा जीएसटीशिवायचा दर 609 रुपयांनी वाढून 126666 रुपये एक तोळा इतका झाला. तर, 22 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा जीएसटीसह119506 रुपये इतका आहे. 18 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा जीएसटीसह दर 97850 रुपये इतका आहे.

Gold Rate : सोन्याच्या दरातील तेजी कायम

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर फेब्रुवारीच्या वायद्याच्या सोन्याचे दर 647 रुपयांनी वाढून 128314 रुपयांवर पोहोचले. तर, चांदीच्या दरात देखील 1485 रुपयांची तेजी एमसीएक्सवर पाहायला मिळाली. 1485 रुपयांच्या तेजीसह चांदीचा एक किलोचा दर 167472 रुपये इतका झाला. आतंरराष्ट्री बाजारात सोन्याच्या दरात सलग चौथ्या महिन्यात वाढ पाहायला मिळत आहे. ज्यामुळं गुंतवणूकरांच्या आशा वाढल्या आहेत. अमेरिकेच्या फेड रिझर्व्ह कडून व्याज दरात कपात केली जाईल, अशी अपेक्षा सोन्यातील गुंतवणूकदारांना आहे.

Continues below advertisement

जीएसटीसह 24 कॅरेट सोन्याचा दर 130465 रुपयांवर पोहोचला आहे. तर, चांदीचा जीएसटीसह दर 169214 रुपये इतका आहे. चांदीचा जीएसटीशिवायचा दर 164286 रुपये इतका होता. गुरुवारी चांदीचा जीएसटीशिवायचा दर 162667 रुपये किलो इतका आहे. तर, सोन्याचा जीएसटीशिवायचा दर गुरुवारी 126057 रुपये इतका होता.

सोन्याचा दर 17 ऑक्टोबरच्या उच्चांकापेक्षा 4208 रुपयांनी कमी आहे. 17 ऑक्टोबरला सोन्याच्या दरानं 130874 रुपयांचा टप्पा गाठला होता. तर, चांदीचा दर 14 ऑक्टोबरला 178100 रुपयांवर पोहोचला होता. तेव्हापासून चांदीचा दर 13814 रुपयांनी घसरला आहे.

23 कॅरेट सोन्याच्या दरात आज 607 रुपयांची वाढ पाहायला मिळाली. 23 कॅरेट सोन्याचा दर 126159 रुपये एक तोळा वर पोहोचले. जीएसटीसह याची किंमत 129943 रुपये इतकी आहे. हे दर मेकिंग चार्जेस शिवायचे आहेत.

22 कॅरेट सोन्याच्या दरात 558 रुपयांची तेजी पाहायला मिळाली. 22 कॅरेट सोन्याचा दर 116026 रुपयांवर पोहोचला. जीएसटीसह या सोन्याचा दर 119506 रुपये इतका आहे.

18 कॅरेट सोन्याच्या दरात 458 रुपयांची ते पाहायला मिळाली. या सोन्याचा द 95000 रुपये तोळा इतका आहे. जीएसटीसह हा दर 97850 रुपयांवर पोहोचतो. तर, 14 कॅरेट सोन्याच्या दरात 357 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. या सोन्याचा एका तोळ्याचा दर 74100 रुपये असून जीएसटीसह तो 76323 रुपयांवर पोहोचला आहे.

दरम्यान, 2025 मध्ये सोन्याचे एका तोळ्याचे दर 50926 रुपयांनी वाढले आहेत. तर, चांदीचा एका किलोचा दर 78269 रुपयांनी वाढला आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून सोन्याचे दर दिवसातून दोनवेळा जाहीर केले जातात. सोन्याचे दर दुपारी 12 आणि सायंकाळी 5 वाजता आयबीजेएकडून जाहीर केले जातात. हे दर देशभरात सर्वत्र सारखे असतात. जीएसटी आणि मेकिंग चार्जेसमुळं विविध शहरात सोन्याचे दर वेगवेगळे असू शकतात.