India Gifted 2023 report : 2023 हे वर्ष संपायला अवघे काही दिवसच उरले आहेत. हा आठवडा संपताच 2024 हे नवीन वर्ष सुरु होईल. दरम्यान, 2023 या वर्षाच्या शेवटी ऑनलाइन गिफ्ट स्टोअर फर्न्स अँड पेटल्सने एक मनोरंजक अहवाल जारी केला आहे. यामध्ये वर्षभर भारतीयांनी भेटवस्तूंसाठी कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिलं आहे, याबाबतची माहिती दिली आहे. 


या अहवालातून अनेक रंजक माहिती समोर आली आहे. उदाहरणार्थ, मोठ्या शहरातील लोक गुलाब, केक आणि चॉकलेट्स यासारख्या गिफ्टिला सर्वाधिक पसंती देतात. आजही अनेक छोट्या शहरांमध्ये मिठाई ही लोकांची सर्वात आवडती भेटवस्तू आहे.


दर मिनिटाला 23 गुलाब भेट 


फर्न्स अँड पेटल्सच्या 'हाऊ इंडिया गिफ्टेड 2023' अहवालानुसार, या संपूर्ण वर्षभरात लोकांनी सर्वाधिक गुलाबाची भेटवस्तू पाठवली आहे. कंपनीने एका वर्षात 1.15 कोटी गुलाबाची फुलं विकली आहेत. याचा अर्थ लोक दर मिनिटाला 23 गुलाब भेट म्हणून पाठवतात. जर आपण इतर फुलांचा समावेश केला तर भारतीयांनी एका वर्षात 1.5 कोटी फुले भेट दिली आहेत.


या शहरातील लोक फुले भेट देण्यात आघाडीवर 


अहवालात दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, दिल्ली आणि चंदीगडसारख्या शहरांतील लोक फुले भेट देण्यात आघाडीवर होते. गुलाबाव्यतिरिक्त, आवडत्या फुलांमध्ये गुलाबी कार्नेशन, जांभळा आणि निळा ऑर्किड, पांढरा कार्नेशन, पिवळा जरबेरा आणि पांढरा लिली यांचा समावेश होता. तर बंगळुरु, हैदराबाद आणि चेन्नई सारख्या शहरांमध्ये लोकांना भेटवस्तू म्हणून कुंडीतील रोपे सर्वाधिक आवडली.


दर मिनिटाला 11 केकची विक्री


फुलांनंतर केकचा दुसरा नंबर आहे. एका वर्षात 70 लाखांहून अधिक केक विकले. म्हणजेच 2023 मध्ये दर मिनिटाला 11 केक भेट म्हणून देण्यात आले. केक आणि चॉकलेट्स भेट देण्यात पाटणा, रांची आणि भुवनेश्वर सारखी शहरे पुढे आहेत. वर्ष 2023 दरम्यान, ट्रेंडमध्ये एक महत्त्वाचा बदल दिसून आला की लोकांची भेटवस्तूंची निवड बदलत आहे. आरोग्यदायी स्नॅक्स आणि सौंदर्यप्रसाधनांच्या गिफ्ट हॅम्पर्सच्या मागणीत 60 टक्के वाढ झाली आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


"गिफ्ट दिलेला पोपट दे, तरच घटस्फोट देईन"; पतीच्या मागणीसमोर पत्नीनं हात टेकले, पुण्यातील अजब घटस्फोटाची गजब कहाणी