Home Loan :  स्वयंरोजगार असणे हा करिअरचा पर्याय नाही; तो जीवनशैलीचा मार्ग आहे. हे कोणतेही घोषवाक्य नाही किंवा बंपर स्टिकर नाही, तर भारतातील वाढती वास्तविकता आहे, जिथे 2023-24 मध्ये देशातील 58.4 टक्‍के कर्मचारी स्वयंरोजगारित होते. इकॉनॉमिक सर्व्‍हेमधून वाढते उद्योजकीय क्रियाकलाप आणि स्थिर कामाच्या व्यवस्थेला प्राधान्य दिले जात असल्‍याचे निदर्शनास आले आहे. स्‍वयंरोजगार असलेल्‍यांसाठी गृहकर्ज मिळवणे अधिक सोपे झाले आहे. याबाबतची माहिती कोटक महिंद्रा बँक लि. हाऊसिंग फायनान्‍सचे बिझनेस हेड मनू सिंग यांनी दिली आहे. 

देशाच्या जीडीपीमध्ये जवळ-जवळ 30 टक्‍के आणि निर्यातीत 40 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त योगदान असूनही स्वयंरोजगार - उद्योजक आणि फ्रीलांसरपासून ते लघु व्यवसाय मालकांपर्यंत, विशेषतः सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) - यांना अनियमित उत्पन्‍न प्रवाह आणि मानक नसलेल्या कागदपत्रांमुळे गृह कर्ज मिळवण्‍यामध्‍ये अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. समकालीन कर्जदाते सर्जनशील किंवा गिग नोकऱ्यांशी संबंधित अस्थिर किंवा प्रकल्प-केंद्रित उन्पन्‍नापेक्षा स्थिर व विश्वासार्ह उत्पन्‍न असलेल्यांना प्राधान्य देतात. या विसंगतीमुळे स्थिर उत्पन्‍न पातळी दाखवण्याची आणि कर्ज-ते-उत्पन्‍न गुणोत्तर निकष पूर्ण करण्याची क्षमता अडथळा ठरली आहे.

कोटकने कर्जदारांच्या खऱ्या क्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी कौशल्य विकसित केले आहे आणि असे करताना, गरज पडल्यास ते पगाराच्या पलीकडे पाहतात. आज, बँक कस्टमाइज्ड गृहकर्ज सोल्‍यूशन्‍स देते, जे महत्त्वाकांक्षी भारतीयांना त्‍यांची स्‍वप्‍नं साकारण्‍यास मदत करत आहेत. हे सीए, आर्किटेक्ट, डॉक्टर आणि व्यापारी, कंत्राटदार व विमा एजंट यांसारख्या गैर-व्यावसायिकांसाठी खुले आहेत, जे स्वतःचा व्यवसाय चालवतात. कोटकसारख्या बँका त्यांच्या ऑफर्समध्ये अनेक फायदे देतात; उदाहरणार्थ, ते त्यांच्या गृहकर्ज ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी जमीन आणि बिल्डर दोघांच्‍याही कागदपत्रांची पडताळणी करतात.

सर्वोत्तम गृहकर्ज मिळवण्यासाठी स्वयंरोजगार असलेल्या व्यक्‍तींना कोणत्या प्रक्रियांचे पालन करावे लागते ते जाणून घेऊया: 

सुरुवात करण्यासाठी सह-अर्जदार आणि चांगला क्रेडिट स्कोअर असणे उत्तम: 

गृहकर्जासाठी अर्ज करताना तुमची पात्रता मजबूत करण्‍याकरिता तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला, शक्यतो कुटुंबातील एखाद्या सदस्याला सह-अर्जदार म्हणून प्राधान्‍य देऊ शकता. ज्‍यामुळे कर्ज परतफेड करण्‍याचा भार दोघांवर समान राहील. तसेच, अनेक जण कर्ज मंजूरीची प्रक्रिया सुलभ करण्याकरिता कर्जासाठी हमीदार देतात. दोन्ही अर्जदारांचा क्रेडिट स्कोअर चांगला असणे उत्तम आहे, ज्यामुळे जलद मंजूरी, चांगला व्याजदर आणि जलद वितरण सुनिश्चित होईल. लक्षात ठेवा की, बँका तुमची पात्रता आणि परतफेडीची क्षमता मूल्यांकन करण्यासाठी तुमच्या मागील व सध्याच्या कर्जांचा विचार करतील.

वय, शिक्षण, उत्पन्‍न - सर्वकाही महत्त्वाचे: 

उत्पन्‍न आणि परतफेड क्षमता पडताळण्यासाठी अर्जदारांनी गेल्या तीन वर्षांचे आयकर परतावा (इन्‍कम टॅक्‍स रिटर्न्‍स) विवरणपत्रे, गेल्या दोन वर्षांचे व्यवसाय घटकाचे किमान ऑडिट केलेली नफा-तोटा खाते विवरणपत्रे व ताळेबंद सादर करणे आवश्यक आहे. प्रोफाइलच्या बाबतीत तुमचे वय, शिक्षण, तुमच्‍यावर अवलंबून असलेल्‍या सदस्‍यांची संख्या, एकूण आर्थिक परिस्थिती आणि तुमच्या उद्योगाची संभाव्य नफाक्षमता हे महत्त्वाचे पैलू आहेत. अशा प्रकारे, अर्जदार कर्जदात्यांना प्रभावित करून मोठ्या प्रमाणात डाउन पेमेंटसह सुरुवात करू शकतो.

परतफेडीचे अनेक पर्याय: 

कर्ज परतफेड करण्‍याच्‍या मुदतीसंदर्भात फ्लोटिंग रेटसाठी जास्तीत-जास्त 30 वर्षांपर्यंतची आणि फिक्स्ड रेट कर्जासाठी 20 वर्षांपर्यंतची मुदत असते, तसेच मंजूर कर्जाची रक्‍कम ग्राहकाची परतफेड क्षमता आणि वय यांसारख्या विविध घटकांवर अवलंबून असते. कर्ज देणारे विविध परतफेडीचे पर्याय देतात, जसे ट्रॅन्चे-आधारित ईएमआय (टप्‍प्‍याटप्‍प्‍याने ईएमआय), त्वरित परतफेड, टेलिस्कोपिक परतफेड इत्यादी. यातील फायदे स्पष्ट करणे आणि योग्य पर्याय निवडणे आवश्यक आहे.

कर लाभ डीलला फायदेशीर करतात: गृहकर्जाला आयकर कायदा, 1961 च्या कलम 24 आणि कलम 80 सी अंतर्गत व्याज व मुद्दल परतफेडीवर कर लाभ मिळतात, ज्यामुळे जुन्या कर व्यवस्थेअंतर्गत स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्‍तीवर एकूण भार कमी होतो. याशिवाय, बँका अंशतः किंवा पूर्ण प्रीपेमेंटसाठी कोणतेही प्रीपेमेंट शुल्क आकारत नाहीत. तसेच, तुमचा व्यवसाय चांगला चालत असताना कर्जासाठी अर्ज करणे आवश्यक आहे आणि मालमत्तेची अंतिम रुपरेषा आखण्यापूर्वी तुमची पात्रता जाणून घेण्यासाठी आगाऊ कर्जाकरिता अर्ज करणे देखील आवश्यक आहे.

सामान्यतः इतर कर्जांच्या तुलनेत कमी व्याजदरामध्‍ये गृहकर्ज दिले जाते. याचा फायदा घेऊन स्वयंरोजगार असलेल्या व्यक्‍ती काही कालावधीत मोठ्या प्रमाणात बचत करू शकतात. सर्वोत्तम आर्थिक उपाय म्‍हणजे, गृहकर्ज व्‍यक्‍तीला रोखप्रवाह किंवा व्यवसाय टिकवून ठेवू शकणाऱ्या संसाधनांचा काही भाग न संपवता मालमत्ता खरेदी करण्याची सुविधा देते. पगारदार वर्गापेक्षा त्यांचे उत्पन्‍न नोंदवण्याच्या बाबतीत स्वयंरोजगार असलेल्या व्यक्‍तींना मिळणारी स्थिरता पाहता गृहकर्ज अंतर्गत फायद्यांसह त्‍यांच्‍या एकूण नफ्यामध्‍ये कर बचतींची भर करू शकते.