मुंबई : केंद्र सरकारच्या आदेशानुसार राज्यभरात सिटी गॅस डिस्ट्रीब्यूशन वाढवण्यासाठी सर्व परवानग्यांची अनिवार्यता 30 जून पर्यंत काढून त्या परवानग्या मिळाल्या आहेत असे समजून काम सुरू करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनानं दिले आहेत,अशी माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये कोणती कंपनी पीएनजीचा पुरवठा करणार यासंदर्भातील माहिती देखील समोर आली आहे.
एलपीजीच्या वापरावर मर्यादा असल्यामुळे पीएनजीच्या पुरवठ्या वाढीवर भर देण्यात येत आहे. त्यासाठी राज्य शासनाने आदेश काढण्यात आले आहेत. 24 तासांच्या आत परवानगी देण्यात यावी. पीएनजीच्या कामासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या परवानगीची आवश्यकता नाही. शिवाय विविध परवानगी मिळविण्यासाठी शुल्काची आकारणी रद्द करण्यात आली आहे, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.
सीटी गॅस डिस्ट्रीब्यूशनची पाईपलाईन जिथून जाते तिथे घरगुती, व्यावसायिक, व्यापारी उपयोगासाठी ही पीएनजी पुरवठ्याची परवानगी दिली जाईल, असं छगन भुजबळ म्हणाले.
महाराष्ट्रात कोणती कंपनी कोणत्या भागात पीएनजीचा पुरवठा करणार?
पालघर जिल्हा, ठाणे ग्रामीण : गुजरात गॅस लिमिटेड रायगड जिल्हा ईएएए : महानगर गॅस लिमिटेड पुणे जिल्हा ईएएए:टोरेंट गॅस पुणे लिमिटेडरत्नागिरी जिल्हा : महानगर गॅस लिमिटेड सोलापूर जिल्हा :आयएमसील लिमिटेड कोल्हापूर जिल्हा : एपीओआयएल गॅस प्रायव्हेट लिमिटेड मुंबई आणि बृहन्मुंबई : महानगर गॅस लिमिटेड पुणे शहर पिंपरी, चिंचवड, हिंजवडी, चाकण, तळेगाव : महाराष्ट्र नॅच्युरल गॅस लिमिटेड ठाणे शहर आणि आसपासच्या महापालिका : महानगर गॅस लिमिटेड अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड धुळे आणि नाशिक जिल्हा : महाराष्ट्र नॅच्युरल गॅस लिमिटेड लातूर आणि धाराशिव : महानगर गॅस लिमिटेडसांगली आणि सातारा : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडसिंधुदुर्ग : महाराष्ट्र नॅच्युरल गॅस लिमिटेडबुलढाणा, नांदेड आणि परभणी जिल्हा : महाराष्ट्र नॅच्युरल गॅस लिमिटेड बीड, जळगाव आणि जालना जिल्हा : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडअकोला, हिंगोली वाशिम जिल्हा : अदानी टोटल गॅस लिमिटेड अमरावती आणि यवतमाळ जिल्हा : अदानी टोटल गॅस लिमिटेड चंद्रपूर आणि वर्धा : मेघा सिटी गॅस डिस्ट्रिब्यूशन प्रा. लिमिटेड नागपूर : एचसीजी नागपूर प्रायव्हेट लिमिटेडभंडारा, गोंदिया आणि गडचिरोली : अदानी टोटल गॅस लिमिटेडनंदूरबार : अदानी टोटल गॅस लिमिटेड
दरम्यान, या कंपन्यांकडून संबंधित जिल्ह्यात काम कधी सुरु केलं जाणार या संदर्भातील माहिती समोर आलेली नाही.
