Billionaires List Top 10 List :  जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत मोठा बदल झाला आहे. मागील काही महिन्यांपासून सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत समावेश असणारे अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी (Gautam Adani) यांना मोठा फटका बसला आहे. शेअर बाजारातील घसरणीमुळे गौतम अदानी हे टॉप-10 यादीतून बाहेर पडले आहेत. 


अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर दरात मोठी घसरण दिसून आली. हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर सात दिवसांच्या आतच अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर दरात मोठी घसरण झाली. अदानी यांच्या मोठ्या संपत्तीत घट झाली असून सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीतून त्यांना टॉप-10 मधील स्थान गमवावे लागले. Bloomberg Billionaires Index नुसार गौतम अदानी यांची एकूण संपत्ती आता 84.4 अब्ज डॉलर इतकी राहिली आहे. गौतम अदानी हे सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत आता 11 व्या स्थानी आहेत. 


मुकेश अंबानी कितव्या स्थानावर? (Mukesh Ambani)


Bloomberg Billionaires Index नुसार, रिलायन्स उद्योगसमूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत 12 व्या स्थानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती 82.2 अब्ज डॉलर इतकी आहे. गौतम अदानी आणि मुकेश अंबानी या दोन श्रीमंत भारतीय उद्योजकांच्या संपत्तीत किरकोळ फरक राहिला आहे. मागील वर्षात, 2022 मध्ये गौतम अदानी हे सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अग्रस्थानी आले होते. 


या वर्षाच्या सुरुवातील संपत्ती सर्वाधिक घट


गौतम अदानी हे वर्ष 2022 मध्ये श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अग्रस्थानी आल्यानंतर चर्चेत आले होते. तर, या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात त्यांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे. संपत्तीत सर्वाधिक घट झालेल्या श्रीमंतांच्या यादीत ते सध्या अदानी टॉपवर आहेत. या महिनाभरात त्यांनी 36.1अब्ज डॉलर इतकी संपत्ती गमावली.  


अब्जाधीशांच्या पहिल्या टॉप यादीत कोण?


फ्रान्सचे बर्नार्ड आर्नोल्ड हे अब्जाधीशांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 189 अब्ज डॉलर इतकी आहे. ईलॉन मस्क यांची संपत्ती 160 अब्ज डॉलर इतकी असून ते दुसऱ्या स्थानावर आहेत. अॅमेझॉनचे जेफ बेझोस यांची संपत्ती 124 अब्ज डॉलर तर बिल गेट्स यांची संपत्ती 111 अब्ज डॉलर इतकी असून ते अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. विख्यात गुंतवणूकदार वॉरेन बफेट हे 107अब्ज डॉलरच्या संपत्तीसह पाचव्या स्थानावर आहेत. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: