Gautam Adani : अदानी समूह आता त्यांच्या ग्रीन हायड्रोजन प्रकल्प सुरु करण्याच्या तयारीत आहे. या प्रकल्पासाठी अदानी समूहाला चार अब्ज डॉलर्स म्हणजेच 33 हजार कोटी रुपयांची गरज आहे. अदानींच्या या योजनेमुळं शेअर बाजारात नवसंजीवनी येऊ शकते. या प्रकल्पामुळं देशाला कमी खर्चात ग्रीन हायड्रोजन मिळेल आणि देशातील प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. 


कमी खर्चात ग्रीन हायड्रोजन मिळेल, प्रदुषण कमी होईल


गौतम अदानी सध्या आपला महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुढे नेण्यात व्यस्त आहेत. अदानी समूह 4 अब्ज डॉलर्स म्हणजेच 33 हजार कोटी रुपयांची योजना बनवत आहे. या नियोजनात अदानी यशस्वी ठरल्यास शेअर बाजारात पैशांची त्सुनामी येऊ शकते. गौतम अदानी त्यांच्या ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी 4 अब्ज डॉलर्स उभारण्याचे काम करत आहेत. यामुळे देशाला कमी खर्चात ग्रीन हायड्रोजन मिळेल आणि देशातील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. विशेष बाब म्हणजे गुरुवारीच अदानी समूहाच्या सिमेंट कंपनी एसीसीचा तिमाही निकाल आला. कंपनी नफ्यात परतली आहे. ही बातमी अदानींना गुंतवणूक वाढवण्यासही खूप मदत करु शकते.


काय आहे गौतम अदानींची योजना?


ब्लूमबर्गने सूत्रांचा हवाला देत माहिती दिली आहे की, ग्रीन हायड्रोजन प्रकल्प पुढे नेण्यासाठी अदानी समूहाने 4 बिलियनची गुंतवणूक उभारण्यास सुरुवात केली आहे. ही रक्कम उभारण्याचे काम प्रामुख्याने अदानी न्यू इंडस्ट्रीजकडे सोपवण्यात आले आहे. अदानींची ही कंपनी स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय कर्जदारांशी संपर्क साधून गुंतवणूक वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनीची बोलणी सुरुवातीच्या स्तरावर आहेत. याबाबत अद्याप कोणतीही ठोस बाब समोर आलेली नाही.


दरम्यान, जून महिन्यात फ्रान्सच्या टोटल एनर्जी आणि अदानी समूहाने भारतात ग्रीन हायड्रोजनच्या उत्पादनासाठी 5 अब्ज डॉलरची गुंतवणूक योजना तयार केली होती. अदानी समूहाच्या प्रमुखाने आधीच पुष्टी केली आहे की कंपनीच्या एकूण भांडवली भांडवलापैकी 75 टक्के ग्रीन हायड्रोजन व्यवसायात गुंतवणूक केली जाईल. पुढील 10 वर्षांमध्ये, कंपनी अक्षय, हरित घटक निर्मिती आणि संबंधित पायाभूत सुविधांवर 20 अब्ज डॉलर खर्च करेल.


अदानी समुहाचे हरित ऊर्जेवर लक्ष 


देशातील मोदी सरकारने आपले संपूर्ण लक्ष हरित ऊर्जा क्षेत्रावर केंद्रित केले आहे. जागतिक स्तरावर या क्षेत्रात भारत अव्वल असेल, असे सरकारने म्हटले आहे. यामुळेच भारतातील दोन सर्वात मोठे अब्जाधीश मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांनी ग्रीन एनर्जीवर लक्ष केंद्रित केले आहे. विशेषत: अदानी समूहाचे संपूर्ण लक्ष आता ग्रीन एनर्जीवर केंद्रित होणार आहे. अदानी समूहाने आपल्या वेबसाइटवर म्हटले आहे की, भारतात एक डॉलर प्रति किलोग्रॅम या दराने हायड्रोजनचे उत्पादन करणे अवघड काम नाही. यामुळं देशाला जीवाश्म इंधनापासून दूर ठेवण्यास मदत होईल. त्याचबरोबर सरकारवरील आयात बिलाचा बोजाही कमी होईल.


बाजारात पैशाची त्सुनामी येणार


गौतम अदानी त्यांच्या योजनेत यशस्वी ठरल्यास अदानी समूहाच्या शेअर्समध्ये वाढ होऊ शकते. ज्याचा एकूण शेअर बाजाराला फायदा होईल. अदानी समूहाच्या शेअर्समुळे शेअर बाजारात पैशाची त्सुनामी येऊ शकते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अदानी समूहाच्या शेअर्स आणि शेअर बाजारात दबाव दिसून येत आहे. गेल्या 6 दिवसात गुंतवणूकदारांचे सुमारे 22 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.


महत्त्वाच्या बातम्या: