Credit card tips: दिवसेंदिवस क्रेडिट कार्ड (Credit Card) वापरणार्यांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. कारण बँका आणि वित्तीय संस्था या क्रेडिट कार्डवर ग्राहकांना अनेक प्रकारच्या सुविधा देतात. दरम्यान, उत्पन्नाचा कोणताही पुरावा नसताना देखील तुम्ही क्रेडिट कार्ड काढू शकता. यासाठी तुम्हाला काही टिप्स फॉलो कराव्या लागतील. पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती...
बँका आणि वित्तीय संस्था ग्राहकांना कोणत्याही उत्पन्नाच्या फ्रूफशिवाय क्रेडिट कार्ड देतात. अनेकवेळा व्यावसायिक किंवा विद्यार्थ्यांनाही क्रेडिट कार्डची गरज भासते. अशा परिस्थितीत उत्पन्नाचा पुरावा नसल्यामुळं क्रेडिट कार्ड मिळण्यात अडचणी येऊ शकतात. तुम्हालाही उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय क्रेडिट कार्ड मिळवायचे असेल, तर तुम्हाला काही टिप्स फॉलो कराव्या लागतील.
उत्पन्नाच्या पुराव्याशिवायही कसं काढाल क्रेडिट कार्ड
1. बँकेत खाते असणं आवश्यक
क्रेडिट कार्ड काढण्यासाठी तुमचे बँकेत खाते असणं आवश्यक आहे. बँक खाते हे कोणत्याही व्यक्तीची आर्थिक ओळख असते. तुम्ही कोणत्याही संस्थेत क्रेडिट कार्डसाठी अर्ज केल्यास त्यात बँक खात्याची माहिती टाकणे आवश्यक आहे.
2. जोडीदाराचे उत्पन्न प्रविष्ट करा
तुमच्याकडे उत्पन्नाचा पुरावा नसेल, पण क्रेडिट कार्ड मिळवायचे असेल, तर तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या उत्पन्नाचा पुरावाही क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी वापरु शकता. यामुळे क्रेडिट कार्ड मिळण्याची शक्यता वाढते.
3. FD वर क्रेडिट कार्ड उपलब्ध होऊ शकते
अनेकदा बँका आणि वित्तीय संस्था एफडीवर सहजपणे क्रेडिट कार्ड उपलब्ध करुन देतात. या प्रकारच्या कार्डला सुरक्षित क्रेडिट कार्ड म्हणतात. या कार्डची मर्यादा साधारणपणे FD रकमेच्या 75 ते 80 टक्के असू शकते. या प्रकारचे क्रेडिट कार्ड मिळविण्यासाठी, तुम्हाला कोणत्याही उत्पन्नाच्या पुराव्याची आवश्यकता नाही.
4. एका क्रेडिट कार्डच्या बदल्यात दुसरे क्रेडिट कार्ड मिळवा
जर तुम्हाला उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय क्रेडिट कार्ड मिळवायचे असेल तर तुम्ही यासाठी तुमचे पहिले क्रेडिट कार्ड देखील वापरु शकता. जर एखाद्या व्यक्तीने आधीच क्रेडिट कार्ड घेतले असेल आणि वेळेवर पैसे देऊन उत्कृष्ट क्रेडिट राखले असेल, तर ते दुसरे क्रेडिट कार्ड मिळविण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. व्यक्तीचा चांगला क्रेडिट स्कोअर पाहून बँक उत्पन्नाच्या पुराव्याशिवायही क्रेडिट कार्ड देऊ शकतात.
या बँका उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय क्रेडिट कार्ड देतात
स्टेट बँक ऑफ इंडिया
बँक ऑफ बडोदा
कोटक महिंद्रा बँक
अॅक्सिस बँक
सेंट्रल बँक ऑफ इंडिया
महत्त्वाच्या बातम्या: