Financial Year End : आज (31 मार्च) 2023-24 या आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस (Financial Year End) आहे. उद्यापासून (1 एप्रिल 2024) हे नवीन वर्ष सुरु होणार आहे. त्यामुळं काही महत्वाची कामं (important tasks) पूर्ण करण्याची मुदत आज संपत आहे. ही कामे काळजीपूर्वक आजच पूर्ण करणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नेमकी आज कोणती कामं पूर्ण करावी लागतील, यासंदर्भातील सविस्तर माहिती पाहुयात. 


अद्ययावत प्राप्तिकर रिटर्न (Updated Income Tax Return)


तुम्हाला आज महत्वाचे काम करावे लागणार आहे, ते म्हणजे अद्ययावत प्राप्तिकर रिटर्न. आजच तुम्हाला हा प्राप्तिकर रिटर्न भरावा लागेल, अन्यथा तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल. आजची मुदत संपल्यानंतर तुम्हाला अतिरीक्त कर आणि व्याज भरावं लागेल. त्यामुळं दंड टाळण्यासाठी तुम्ही आजच आयकर रिटर्न भरा. 


कर बतचीसाठी आज शेवटचा दिवस


तम्हाला जर आयकर सवलत मिळवायची असेल तर तुम्हाला आजच गुंतवणूक करावी लागेल, अन्यथा त्यानंतर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आज गुंतवणूक केली तरच तुम्हाला कर बचतीचा लाभ मिळेल, उद्या गुंतवणूक केल्यास तुम्हाला पुढील आर्थिक वर्षात त्याचा लाभ मिळेल. 


या योजनात गुंतवणूक करा, 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सूट मिळवा


तुम्हाला जर करात सवलत मिळवायची असेल तर तुम्ही आजच विविध योजनांमध्ये गुंतवणूक करु शकता. या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. नॅशनल पेन्शन सिस्टम, इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम, ज्येष्ठ नागरिक बचत योजना यासारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख ही 31 मार्च आहे. या योजनांमध्ये आजच गुंतवणूक केल्यास तुम्हाला 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सूट मिळू शकते. 


म्युच्युअल फंड केवायसी पूर्ण करण्यासाठी आज शेवटचा दिवस


म्युच्युअल फंड केवायसी पूर्ण करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. आज जर तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंड केवायसी पूर्ण केली नाहीतर तुम्ही 1 एप्रिलपासून म्युच्युअल फंडाचे व्यवहार पूर्ण करु शकणार नाही. यामध्ये आधार कार्ड, पारपोर्ट, मतदान ओळखपत्राचा समावेश आहे. 


FASTag KYC


FASTag KYC पूर्ण करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. आजच हे काम पूर्ण करा अन्यथा तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.


विमा पॉलिसीच्या नियमांमध्ये बदल 


उद्यापासून म्हणजे 1 एप्रिलपासून विमा पॉलिसीच्या नियमांमध्ये बदल होत आहे.  IRDAI ने विमा पॉलिसी सरेंडर करण्यासाठी नवीन नियम केले आहेत. हे नवीन नियम उद्यापासून लागू केले जाणार आहेत. जुने नियम आजच संपत आहेत. 


FD योजनांची मुदत 


SBI सह IDBI या बँकांच्या FD योजनांची मुदत आज संपत आहे. या विशेष योजनांमध्ये ग्राहकांना 7 टक्क्यांच्या पुढे व्याज दिले जाते. 


महत्वाच्या बातम्या:


आर्थिक वर्ष 31 मार्चलाच का संपते? 31 डिसेंबरला का नाही? नेमकी काय आहेत कारणं