Continues below advertisement

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओनं खातेदारांना नवी सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ईपीएफओनं UAN पोर्टलवर Passbook Lite सुविधा सुरु केली आहे. यापूर्वी खातेदारांना मेंबर पासबुक ईपीएफओ या पोर्टलवर भेट देत पासबुक डाऊनलोड करावं लागत होतं. खात्यात किती रक्कम शिल्लक आहे हे पाहण्यासाठी देखील मेंबर पासबुक पोर्टलला भेट द्यावी लागायची. आता UAN पोर्टलवर Passbook Lite सुविधा उपलब्ध झाल्यानं खातेदारांना दिलासा मिळाला आहे. ईपीएफओनं पासबुक पोर्टलवर (https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/) या पोर्टलवर पासबुक लाईट ही नवी सुविधा सुरु झाली आहे.

EPFO Passbook Lite का सुरु करण्यात आलं?

पीआयबीच्या रिपोर्टनुसार आता खातेदार पासबुक लाईट सुविधेमुळं मेंबर पासबुक ईपीएफओ या वेबसाईटला स्वतंत्र द्यावी लागणार नाही. पासबुक लाईट सुविधेद्वारे संक्षिप्त रुपात पासबुक, खात्यात जमा करण्यात आलेली रक्कम, शिल्लक रक्कम अशी माहिती उपलब्ध होईल. यामुळं एकाच लॉगीनवर सर्व सेवा उपलब्ध झाल्यानं खातेदारांना दिलासा मिळणार आहे. सविस्तर माहिती आवश्यक असल्यास मेंबर पासबुक ईपीएफओ पोर्टलला भेट देऊ शकता.

Continues below advertisement

ऑनलाईन Annexure K सुविधा

जेव्हा कर्मचारी नोकरी बदलतो तेव्हा त्याच्या पीएफ खात्यातील रक्कम नव्या खात्यात वर्ग केली जाते. यासाठी ऑनलाईन फॉर्म क्रमांक 13 भरावा लागतो. पीएफ ट्रान्सफर केल्यानंतर ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणजेच (Annexure K) मिळतं. हे प्रमाणपत्र यापूर्वी पीएफ कार्यालयांना मिळत होतं. नव्या निर्णयानुसार आता ते कर्मचाऱ्यांना मेंबर पोर्टलवरुन पीडीएफ फॉरमॅटमध्ये उपलब्ध होईल.

आता खातेदार थेट वेबसाईटवरुन Annexure K डाऊनलोड करता येईल. जेव्ह गरज असेल तेव्हा Annexure K डाऊनलोड करता येईल. यामुळं खातेदार ऑनलाईन पीएफ ट्रान्सफर अर्जाची स्थिती पाहू शकतो. यामुळं पीएफ पोर्टलवरील पारदर्शकता वाढेल.

सध्या पीएफ ट्रान्सफर, अॅडव्हान्स, रिफंड यासाठी मंजुरी प्रादेशिक प्रॉविडंट फंड आयुक्तांकडून घेतली जाते. यामुळं दावे मंजूर व्हायला वेळ लागतो.आता सहाय्यक पीएफ आयुक्तांना देखील अधिकार दिले जाणार आहेत. 

Passbook Lite कुठं पाहता येणार? 

ईपीएफओच्या यूएएन मेंबर इंटरफेस पोर्टलवर यूएएन क्रमांक आणि पासवर्ड नोंदवून लॉगीन करा. यानंतर मोबाईलवर आलेला ओटीपी नोंदवावा लागेल. यानंतर View या पर्यायवर क्लिक केल्यानंतर Passbook Lite ही लिंक उपलब्ध होईल. ईपीएफओकडून खातेदारांना त्यांच्या शिल्लक रकमेवर दरवर्षी व्याज दिलं जातं.पीएफ खात्यातून विविध कारणांसाठी रक्कम काढता येते.त्यासाठी क्लेम फॉर्म भरावा लागतो.