PF Transfer Job Change नवी दिल्ली :एम्पलॉईज प्रॉविडंट फंड ऑर्गनायझेशननं खातेदारांना दिलासा देणारी अपडेट दिली आहे. संघटित क्षेत्रातील खासगी कंपन्यांमध्ये काम कर्मचारी अनेकदा खाती नोकरी बदलत असतात. त्यामुळं त्यांच्या यूएएन क्रमांकावर कंपनीनिहाय खाते क्रमांक तयार होत असतात. आता ईपीएफओनं ज्या खातेदारांच्या यूएएन क्रमांकाशी आधार क्रमांक लिंक असेल त्यांच्यासाठी नवी सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं एखाद्या कर्मचाऱ्यानं नोकरी बदलल्यास जुन्या किंवा नव्या एम्पलॉयरच्या संमतीनं प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करण्याचा नियम रद्द करण्यात आला आहे.
ईपीएफओनं यासंदर्भातील एक पत्रक 15 जानेवारी 2025 ला जारी केलं आहे. ज्यामध्ये नोकरी सोडल्यानंतर पीएफ ट्रान्सफर करण्यासंदर्भातील प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. त्यामुळं एखाद्या कर्मचाऱ्यांनं नोकरी बदलल्यास नव्या किंवा जुन्या कंपनीच्या व्यवस्थापनाकडून पीएफ ट्रान्सफरला मंजुरी घेण्याची गरज राहणार नाही. 1 ऑक्टोबर 2017 नंतर ज्या कर्मचाऱ्यांना यूएएन क्रमांक जारी करण्यात आलेत आणि ते आधार लिंक्ड आहेत त्यांना एखाद्या मेंबर आयडीवर प्रॉविडंट फंडची रक्कम वर्ग करता येईल.
एखाद्या प्रकरणात 1 ऑक्टोबर 2017 नंतर दोन यूएएन क्रमांक देण्यात आले असल्यास आणि ते आधार क्रमांकासोबत लिंक असल्यास अशा प्रकरणात प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करता येईल.
एकाच यूएएन क्रमांकावर असलेल्या अनेक मेंबर आयडीमध्ये प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करता येईल. मात्र, अशा प्रकरणात यूएएन क्रमांक 1 ऑक्टोबर 2017 नंतर पूर्वी गेलेला असावा. मात्र, त्यामध्ये कर्मचाऱ्याची सर्व माहिती व्यवस्थित आणि बरोबर असलेी असावी. यूएएन क्रमांक आधार क्रमांकाशी जोडलेला असणं आवश्यक आहे.
दोन यूएएन क्रमांकाच्या मेंबर आयडीमध्ये ट्रान्सफर करायची असल्यास एक यूएएन क्रमांक 1 ऑक्टोबर 2017 पूर्वी दिला गेलेला असावा. मात्र, यामध्ये किमान एक क्रमांक आधार क्रमांकाशी जोडलेला असावा. याशिवाय खातेदाराचं नाव, जन्मतारीख आणि लिंग याबाबतची माहिती योग्य असावी.
एम्प्लॉयरच्या परवानगी शिवाय पीएफ वर्ग करायचा असल्यास कर्मचाऱ्याची वैयक्तिक माहिती बरोबर असणं आवश्यक आहे. ज्या कर्मचाऱ्यांच्या ईपीएफओवरील प्रोफाईलवर सर्व माहिती योग्यप्रकारे नोंदवण्यात आलेली असावी. तरच खातेदार थेट पीएफ ट्रान्स्फरसाठी दावा करु शकतात. म्हणजेच आधार लिंक्ड यूएएन क्रमांक असल्यास आणि कर्मचाऱ्याची पोर्टलवरील माहिती जुळत असल्यास एम्प्लॉयरच्या मंजुरीशिवाय प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करु शकता.
इतर बातम्या :