नवी दिल्ली : देशभरातील कोट्यवधी पीएफ खातेदारांना दिलासा देणाऱ्या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच केली जाणार आहे. देशभरातील संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पीएफ खाती कर्मचारी पेन्शन फंड ऑर्गनायझेशन म्हणजे इपीएफओकडे काढले जातात. इपीएफओमधील पीएफ खात्यात आणि पेन्शन खात्यात मूळ वेतनाच्या 12 टक्के रक्कम कर्मचारी आणि त्यांच्या कंपनीकडून जमा केले जातात. यापैकी पीएफ खात्यातील काही रक्कम विविध कारणासाठी काढता येते. सध्या पीएफ खात्यातून रक्कम काढायची असल्यास यूएएन पोर्टलवरुन अर्ज सादर करावे लागतात. आता इपीएफओ 3.0 सुरु होणार आहे. त्यामध्ये खातेदारांना पीएफ खात्यातील पैसे एटीएममधून काढता यावी यासाठी यंत्रणा विकसित केली जाणार आहे. त्याद्वारे पीएफचे पैसे काढण्याची प्रक्रिया सोपी केली जाणार आहे. याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. श्रम मंत्रालयाच्या सचिव सुमिता डावरा यांनी याबाबत माहिती दिली आहे. 


श्रम विभागाच्या सचिव सुमिता डावरा यांनी 2025 च्या सुरुवातीपासून म्हणजेच जानेवारीपासून पीएफ खातेधारक त्यांच्या पीएफची रक्कम एटीएममधून काढू शकतात, असं म्हटलं.  


नोकरदार लोकांना पीएफची रक्कम काढताना अनेकदा समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यासाठी इपीएफओच्या यूएएन पोर्टलवर लॉगीन करुन अर्ज सादर करावे लागतात. आता नोकरदारांचा त्रास कमी करण्याच्या हेतूनं पीएफची रक्कम एटीएममधून काढण्याची सुविधा सुरु केली जाणार आहे. 
 
श्रम विभागाच्या सचिव सुमिता डावरा यांनी यासंदर्भात मोठी अपडेट दिली आहे. पुढील वर्षी म्हणजेच एका महिन्यानंतर कर्मचारी त्यांच्या पीएफ खात्यातील रक्कम एटीएममधून काढू शकतात. सुमिता डावरा एएनआयसोबत बोलत होत्या. 2025 च्या सुरुवातीपासून पीएफची रक्कम कर्मचाऱ्यांना त्यांच्या एटीएममधून काढता येईल, हा देशातील सर्वात मोठ्या मनुष्यबळाला चांगली सेवा देण्यासाठी आणि पीएफ रक्कम काढण्याची प्रक्रिया सोपी करण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात येणार आहे. 


पीएफ खात्यातील रक्कम काढण्यासाठी सध्या यूएएनच्या पोर्टलवर लॉगीन करुन अर्ज दाखल करावे लागतात. यूएएन पोर्टलवर लॉगीन केल्यानंतर कर्मचाऱ्यांना काही ठराविक कारणांसाठी पीएफ खात्यातून रक्कम काढता येते. करोना संसर्गाच्या काळात किमान 75 टक्के रक्कम काढण्याची सेवा सुरु करण्यात आली होती. तर, आजारपण, नव्या घराची खरेदी, लग्न यासह इतर कारणांसाठी पीएफ खात्यातून रक्कम काढता येते. मात्र, आजारपण वगळता इतर कारणासाठी रक्कम काढायची असल्यास सेवा किमान पाच वर्ष पूर्ण झालेली असणं आवश्यक असतं. 


इतर बातम्या :