EPFO नवी दिल्ली: ईपीएफओनं पीएफ खात्यातील पैसे एटीएम सेंटरमधून काढण्याची सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती समोर आल्यानं पीएफ खातेधारकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. केंद्रीय श्रम सचिव सुमिता डावरा यांनी काही दिवसांपूर्वी  पीएफ खात्यातील पैसे एटीएममधून काढण्याची सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याचं म्हटलं होतं. पुढील वर्षी म्हणजेच जानेवारी 2025 पासून एटीएम सेंटरवरुन पीफ खात्यातून पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळं आता हे स्पष्ट झालंय की ईपीएफओ खातेदारांकडून पैसे काढण्यासाठी बँकिंग प्रणाली सारखी सुविधा निर्माण करुन दिली जाणार आहे.  


ईपीएफओ खात्यातून पैसे काढण्यासाठी नवी प्रक्रिया


पीएफ खात्यातील रक्कम काढण्यासाठी एटीएम कार्ड सारखं एक कार्ड पीएफ खातेदारांना दिलं जाऊ सकतं. सुमिता डावरा यांच्या माहितीनुसार हॉर्डवेअर अपडेट केलं जाणार आहे. त्यानंतर नवी प्रणाली सुरु केली जाणार आहे. सध्या ईपीएफओ खातेदारांना क्लेम सेटल होण्यासाठी 7 ते 10 दिवसांची वाट पाहयला लागते.   


पीएफ खात्यातील 50 टक्के रक्कम काढता येणार


कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या खातेदारांना हे माहिती असणं आवश्यक आहे की त्यांच्या खात्यात जमा असलेल्या पीएफ खात्यातील 50 टक्के रक्कम एटीएम सारख्या कार्डवरुन काढता येणार येईल. याबाबत सूत्रांनी माहिती दिली आहे.  


पीएफ खातेदारांच्या वारसांना देखील पैसे काढता येणार


श्रम सचिव सुमिता डावरा यांनी दिलेल्या माहितीनुसार एखाद्या खातेदारांचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबातील वारसदारांना नॉमिनीनं एटीएम सारख्या स्मार्ट कार्ड सारख्या एम्प्लॉई डिपॉझिट  लिंक्ड इन्शुरन्स द्वारे क्लेमची रक्कम काढता येईल. यासाठी एम्प्लॉयरकडून योगदान दिलं जाईल. 


किती पगारावर किती रक्कम काढता येणार?


ज्या खातेदारांचा सरासरी मासिक पगार 15 हजार रुपये आहे, त्याला 7 लाख रुपयांपर्यंत रक्कम पीएफ खात्यातून मिळेल. ज्यांचं मासिक सरासरी उत्पन्न 15 हजारांपेक्षा कमी आहे त्यांना 5.5 लाख रुपयांची रक्कम एटीएममधून काढण्याची सुविधा देण्यात येईल.  


सध्या पीएफ खात्यातून रक्कम काढायची असल्यास  आजारपण, लग्न, घर खरेदी या कारणांसाठी रक्कम काढता येते आहे. मात्र, त्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याला किमान 5 वर्षांची सेवा पूर्ण केलेली असणं आवश्यक असतं. 


इतर बातम्या :



HDFC बँकेत तुमचं खातं आहे का? 12 कोटी ग्राहकांना बँकेनं केलं अलर्ट, जाणून घ्या सविस्तर माहिती