EPFO New Rules 2026 नवी दिल्ली: कर्मचारी भविष्य निधी संघटना म्हणजेच ईपीएफओनं EPF, EPS आणि EDLI योजना 2026 नुसार पीएफ संदर्भातील काही नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. या बदलांचा उद्देश पीएफ खातेदारांसाठी नियम सुलभ करणे, पीएफ खात्यातून पैसे काढण्याची प्रक्रिया सोपी आणि सुरळीत करणे, सेवांना डिजीटल करणे आणि पीएफ क्लेम मंजूर करण्याची प्रक्रिया वेगवान करणे हा आहे. नव्या नियमांमध्ये कर्मचारी आणि नियोक्ता यांच्या योगदानाची व्यवस्था कायम ठेवली आहे. मात्र, पीएफचे पैसे काढण्याच्या अटी, बेरोजगारीनंतर पूर्ण रक्कम काढण्याची कालमर्यादा, नॉमिनेशनआणि क्लेम सेटलमेंट यासंदर्भात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

Continues below advertisement

पीफ खात्यात कर्मचारी आणि कंपनीचं योगदान किती?  नव्या नियमांनुसार कर्मचाऱ्यांचं वैधानिक योगदान मूळ वेतनाच्या 12 टक्के कायम ठेवण्यात आलं आहे. पीएफमध्ये योगदान देण्याची  मूळ वेतनाची मर्यादा 15000  रुपये मासिक वेतन लागू आहे. या नियमानुसार दरमहा योगदान 1800 रुपये होतं. ज्यांचं मूळ वेतन 15000 रुपयांपेक्षा असेल ते स्वेच्छेनं पीएफमध्ये योगदान देऊ शकतात.

पीएफची 15000 वेतन मर्यादेत बदल शक्य

जुन्या ईपीएफ योजनेत 15 हजारांच्या वेतनमर्यादेचा उल्लेख होता. नव्या 2026 च्या नियमांमध्ये वेतन मर्यादेत केंद्र सरकारकडून वेळोवेळी बदल केले जाऊ शकतात.

Continues below advertisement

पैसे काढण्याच्या नियमात बदल

ईपीएफओनं पीएफ खात्यातून पैसे काढण्याच्या वेगवेगळ्या नियमांमध्ये बदल करण्याचा प्रयत्न आहे. पहिल्यांदा पीएफ खात्यातून वेगवेगळ्या करणांसाठी पैसे काढण्याचे नियम वेगळे होते. आता पैसे काढण्यासाठी तीन गटात वर्गीकरण करण्यात आलं आहे. आवश्यक गरजा, घराशी संबंधित गरजा आणि विशेष परिस्थितीत पैसे काढता येऊ शकतात. 

पीएफ खात्यात 25 टक्के रक्कम किमान शिल्लक

नव्या नियमांनुसार ईपीएफच्या खात्यातील दोन भागांची व्यवस्था कायम राहील. यामध्ये 25 टक्के रक्कम किमान शिल्लक ठेवावी लागेल. निश्चित अटींसह 75 टक्के रक्कम काढता येऊ शकते. 

पीएफ काढण्यासाठी 12 महिन्यांची सेवा आवश्यक

नव्या नियमांनुसार पीएफ खात्यातून पैसे काढण्याचा कालावधी एकसमान करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यापूर्वी वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे काढण्यासाठीची कालमर्यादा वेगळी होती. आता सामान्यपणे पैसे काढण्यासाठी 12 महिन्यांची सेवा पूर्ण करणं आवश्यक आहे. वैद्यकीय कारणांसाठी देखीलपैसे काढण्याची सेवा देखील 12 महिन्यांची अट ठेवण्यात आली आहे. 

नोकरी सोडल्यानंतर पूर्ण पीएफ काढण्यासाठी 12 महिन्यांचा वेळ 

सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम काढण्यासाठी 2 महिने बेरोजगार राहिल्यानंतर तो पर्याय होता. नव्या बदलानंतर पीएफची पूर्ण रक्कम काढण्यास 12 महिने बेरोजगार राहिल्यानंतर तो पर्याय उपलब्ध असेल. पीएफ खातेदार पात्र असल्यास ठराविक रक्कम पीएफ खात्यातून काढता येऊ शकते.

पीएफ नॉमिनेशन पूर्णपणे डिजीटल 

ईपीएफओनं नॉमिनेशन  प्रक्रिया डिजीटल करण्यावर भर दिला आहे. नव्या नियमानुसार छापील नामांकन फॉर्म टप्प्या टप्प्यानं कमी करत ऑनलाईन नॉमिनेशनसाठी औपचारिक मान्यता देण्यात आली आहे.

पीएफ क्लेमवर 20 दिवसात निर्णय

नव्या नियमांनुसार पीएफ क्लेम मंजूर करणे, नामंजूर करणे यासाठी 20 दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. 20 दिवसात क्लेमबाबत निर्णय न घेतल्यास जबाबदारी निश्चित करत दंड करण्याची तरतूद करण्यात आली आहे.      दरम्यान, ईपीएफओच्या 2026 च्या नियमांनुसार पीएफमधून पैसे काढण्याची प्रक्रिया आणि डिजीटल सेवा सुरळीत करण्यावर जोर दिला जात आहे. निवृत्तिसाठीची रक्कम दीर्घकाळ सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न देखील करण्यात आली आहे.