स्वतंत्र उद्योजक होणे हे उत्साहपूर्ण आणि अनेक आव्हानांनी भरलेले असते. महिन्याला पगार येणाऱ्या नोकरदारांप्रमाणे उद्योजकांचे उत्पन्न हे निश्चित नसते. बाजारातील स्थिती, क्लायंटकडून येणारे पैसे तसेच उद्योग या सर्व बाबींवर उद्योजकांचे उत्पन्न ठरलेले असते. स्वतंत्र उद्योग असल्यामुळे संबंधित व्यक्तीला त्याचे स्वप्न पूर्ण करण्यास मुभा मिळते. मात्र उद्योजक म्हणून स्वप्न पूर्ण करताना अनेक प्रकारची आर्थिक अनिश्चितताही येते. त्यामुळे ही अनिश्चितता लक्षात घेऊन उद्योजकांचा टर्म इन्शुरन्स असणे फार महत्त्वाचे असते.

उद्योजकांसाठी टर्म इन्शुरन्स का महत्त्वाचा?

1) उत्पन्नाची अनिश्चितता आणि आर्थिक सुरक्षा : उद्योजकांचे उत्पन्न हे निश्चित नसते. ते प्रत्येक महिन्याला बदलते. त्यामुळे एखादी अप्रिय आणि दुर्दैवी घटना घडल्यास कुटुंब सुरक्षित राहावे तसेच कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी टर्म इन्शुरन्स गरजेचा आहे.

2) लोकांची देणी आणि व्यवसायासाठी घेतलेले कर्ज : अनेक उद्योजक हे व्यवसाय चालवण्यासाठी किंवा तो वाढवण्यासाठी व्यावसायिक कर्ज घेतात. काही उद्योजक तर त्यांची बचतही त्यांच्या उद्योगांमध्ये टाकतात. अशा स्थितीत उद्योजकासोबत काही दुर्दैवी घटना घडली किंवा उद्योजकाचा मृत्यू झाल्यास या कर्जामुळे त्याचे कुटुंबीय अडचणीत सापडतात. न फेडलेल्या कर्जाचे ओझे त्याच्या कुटुंबीयांवर पडते. असे होऊ नये म्हणून टर्म इन्शुरन्स गरजेचा आहे. टर्म इन्शुरन्स असेल तर कुटुंबावर कर्जाचा भार पडत नाही.

3) प्रोव्हिडेन्ट फंडचा फायदा मिळत नाही : पगारदार लोकांना कंपन्या विमा कवच पुरवतात. कर्मचाऱ्यांसाठीची सुविधा म्हणून काही कंपन्याचे तसे धोरण असते. मात्र उद्योजकांना अशा प्रकारचे कोणतेही सुरक्षाकवच नसते. त्यामुळे उद्योजकांनी त्यांच्या स्वत:च्या सुरक्षेकडे लक्ष दिले पाहिजे. त्यांनी टर्म इन्शुरन्सच्या माध्यमातून स्वत:चे तसेच कुटुंबाचे आयुष्य सुरक्षित करून घेतले पाहिजे. सध्या ती काळाजी गरज आहे.

4) परवडणारा आणि चांगला टर्म प्लॅन : टर्म इन्सुरन्स ही अशी सुविधा आहे, जिच्या मदतीने अगदी कमी पैसे देऊन तुम्ही तुमचे भविष्य सुरक्षित करू शकता. टर्म इन्सुरन्सच्या माध्यमातून कमीत कमी प्रिमियम देऊन तुम्ही लाईफ कव्हर मिळवू शकता. टर्म इन्सुरन्सच्या माध्यमातून तुमच्या अनुपस्थितीत तुमचे कुटुंबीय कसे सुरक्षित राहतील याची तजवीज तुम्ही करू शकता.

एचडीएफसी लाईफ क्लिक 2 प्रोटेक्ट सुपर प्लॅन नेमका काय आहे ?

उद्योजकांना परवडणारा आयुर्विमा हवा असेल तर त्यासाठी HDFC Life Click 2 Protect Super हा प्लॅन सर्वोत्तम पर्यायांपैकी एक आहे. या प्लॅनमध्ये कमीत कमी प्रिमियम देऊन तुमच्या अनुपस्थितीत तुमचे कुटंबीय आर्थिक दृष्टीने कसे सुरक्षित राहतील, याची खात्री तुम्ही करू शकता. या प्लॅनमुळे तुमचे कुटंबीय आर्थिक दृष्टीने स्थिर राहण्यास मदत होते.

एचडीएफसी लाईफ क्लिक 2 प्रोटेक्ट सुपर प्लॅनचे नेमके फायदे काय आहेत?

1) तुमच्या प्लॅनच्या मॅच्युरिटनीनंतर तुम्ही भरलेले सर्व प्रिमियम तुम्हाला परत मिळण्याची सोय या प्लॅनमध्ये आहे. म्हणजेच तुम्ही या प्लॅनअंतर्गत क्लेम केला नसल्यास तुम्ही प्रिमियम म्हणून दिलेले सर्व पैसे परत मिळतात.

2) या प्लॅनमध्ये तुम्हाला तब्बल 200 टक्क्यांपर्यंत लाभ मिळू शकतो.

एक स्वतंत्र उद्योजक म्हणून तुमच्या अथक प्रयत्नांनंतर तुमच्या उद्योगाला भरभराट येते. पण या काळात तुमच्या कुटुंबाची सुरक्षा मात्र अनिश्चित नसावी. त्यामुळेच एचडीएफसी लाईफ क्लिक 2 प्रोटेक्ट सुपर हा प्लॅन तुम्हाला तुमचे स्वप्न तसेच तुमचे प्रियजन, कुटुंबीय सुरक्षित कसे राहतील याची हमी देतो. त्यामुळेच या प्लॅनमध्ये लवकरात लवकर गुंतवणूक करणे गरजेचे आहे.

 Disclaimer:

This article is a featured article. ABP Network Pvt. Ltd. and/or ABP Live do not in any manner whatsoever endorse/subscribe to the contents of this article/advertisement and/or views expressed herein. Reader discretion is advised.