Oil Import : दिवाळीच्या तोंडांवर सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी कानावर येऊ शकते. देशात खाद्यतेलाच्या किंमती घसरण्याची शक्यता आहे. भारतात ऑगस्ट महिन्यामध्ये पामतेलाच्या (Palm Oil) आयातील 87 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर सप्टेंबर महिन्यात 10 लाख टन तेल आयात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात खाद्यतेल स्वस्त होण्याची शक्यता आहे. भारताने ऑगस्ट महिन्या विक्रमी तेल आयात केली आहे. जुलै महिन्याच्या तुलनेनं ऑग्सट महिन्यात भारतानं 87 टक्के जास्त तेल आयात केलं आहे. ही मागील 11 महिन्यामधील सर्वाधिक आयात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेलाच्या किंमती 40 टक्क्यांनी घसरल्या आहेत. पामतेलाची किंमत 1800-1900 डॉलर मेट्रिक टनवरून घसरून 1000-1100 डॉलर मेट्रिक टन वर पोहोचली आहे.
पामतेलाची आयात वाढली
देशातील तेलाची आयात वाढल्यानं येत्या काळात खाद्यतेलाच्या किमतीत घट होण्याची शक्यता आहे. भारत (India) जगभरातील सर्वात मोठ्या तेल आयात (Palm Oil Importer) करणाऱ्या देशांपैकी एक आहे. भारताने जुलै महिन्याच्या तुलनेत विक्रमी तेल आयात केली आहे. ऑगस्ट महिन्यात देशात 9,94,997 टन पामतेल आयात करण्यात आलं. त्याच्या तुलनेनं जुलै महिन्यात 5,30,420 टन पामतेल आयात करण्यात आलं होतं. हे प्रमाण 87 टक्क्यांनी वाढलं. तर सप्टेंबर महिन्यात देशात 10 लाख टन तेल आयात केलं जाऊ शकतं.
सणासुदीच्या काळात खाद्यतेल स्वस्त होणार?
इतर खाद्यतेलापेक्षा पामतेल स्वस्त किमतीला उपलब्ध असल्याने तेल कंपन्यांनी अधिक पामतेल आयात केलं आहे. त्याचवेळी भारतात सणासुदीचा काळ आहे. काही दिवसांवर दिवाळी आहे. तसेच त्यामुळे लग्नसराईचा हंगामही येत आहे. अशा परिस्थितीत पामतेलाची मागणी वाढू शकते. त्यामुळे पामतेलाची आयात वाढली असून आगामी काळात खाद्यतेल स्वस्त होण्याची शक्यता आहे.
पामतेलाच्या आयातीवर 5.5 टक्के कर
केंद्र सरकारने पामतेलाच्या आयातीवर 5.5 टक्के कर लावला आहे. त्याचबरोबर सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलाची आयात चालू आणि पुढील वर्षासाठी शुल्कमुक्त करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Semiconductor Gujarat: सेमीकंडक्टरचा प्रकल्प गुजरातमध्ये; महाराष्ट्राचं किती नुकसान?
- Semi Conductor Project : महाराष्ट्रात येणारा उद्योग गुजरातमध्ये कसा? आदित्य ठाकरेंच्या ट्वीटने चर्चांना उधाण