Donald Trump नवी दिल्ली: यूरोपियन सेंट्रल बँकेनं सलग सातव्यांदा व्याज दरात कपात केली. याशिवाय यापुढं देखील व्याज दरात कपात करण्याचे संकेत ईसीबीनं दिले आहेत. मात्र, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे चेअरमन जेरोम पॉवेल यांनी व्याज दरात नजीकच्या काळात कपात न करण्याचे संकेत दिले आहेत. पतधोरणाविषयक निर्णय घेण्यात कोणतीही घाई करणार नाही, असं पॉवेल म्हणाले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून आयात शुल्काचं जे धोरण राबवण्यात येत आहे. त्याचा अर्थव्यवस्थेवर काय होतो याकडे पॉवेल यांचं लक्ष आहे. 

पॉवेल यांच्यावर ट्रम्प नाराज

अमेरिकेचे अध्यक्ष पॉवेल यांच्या व्याजदरात कपात न करण्याच्या धोरणामुळं नाराज आहेत. ट्रम्प यांनी एका पोस्टमध्ये फेडरल रिझर्व्हची तुलना ईसीबीसोबत केली. पॉवेल यांच्यावर टीका करताना ट्रम्प यांनी नेहमी उशिरानं आणि चुकीचे या शब्दांचा वापर केला. पॉवेल यांनी यूरोपियन सेंट्रल बँकेप्रमाणं व्याज दरात कपात केली पाहिजे. फेडलरल रिझर्व्हनं व्याज दर डिसेंबर पासून 4.25-4.50 टक्क्यांच्या दरम्यान ठेवले आहेत. सप्टेंबर ते डिसेंबर 2024 या काळात व्याज दरात कपात केली होती.  

ट्रम्प यांच्याकडून व्याजदर कपातीसाठी दबाव

ट्रम्प यांनी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये तेल आणि किराणा वस्तूंच्या किमती कमी झाल्या आहेत. अमेरिका टॅरिफद्वारे श्रीमंत होत आहे. ईसीबीप्रमाणं अगोदर व्याज दरात कपात  करायला हवी होती. आता तर पॉवेल यांनी व्याज दरात कपात करावी, अशी भूमिका ट्रम्प यांची आहे.  

फेडलरल रिझर्व्हच्या धोरणकर्त्यांसमोर सध्या आव्हानं आहेत. बुधवारी शिकागो येथील इकोनॉमिक क्लबमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पॉवेल यांनी टॅरिफमुं महागाई वाढू शकते, असं म्हटलं. या काळात फेडला कमजोर आर्थिक विकास दराचा सामना करणं अवघड होऊ शकतो. जेरोम पॉवेल यांनी यापूर्वी महागाई कमी झाली नाही तर व्याजदर अधिक राहतील, असं म्हटलं.  

पॉवेल यांना ट्रम्प बडतर्फ करणार?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल रिझर्व्हचे चेअरमन जेरोम पॉवेल यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले बडतर्फी इतक्या लवकर होऊ शकत नाही. विशेष बाब म्हणजे 2017 मध्ये ट्रम्प यांनी  जेरोम पॉवेल यांना फेडरल रिझर्व्हचे चेअरमन म्हणून नियुक्त केलं होतं. त्यांचा कार्यकाळ मे 2026 मध्ये संपणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या टर्ममध्ये देखील पॉवेल यांच्यासोबत वाद झाले होते. 2018 मध्ये व्याजदर घटवण्यावरुन वाद झाले होते.