Donald Trump : अमेरिकेसोबत खेळ खेळू नका, मोठी हानी करेन, BRICS देशांना ट्रम्प यांच्याकडून नवी धमकी, कारण काय?
Donald Trump : ब्रिक्स देशांना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा इशारा दिला आहे. अमेरिकेसोबत खेळणाऱ्या देशांचं मोठं नुकसान करु असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांना पुन्हा इशारा दिला आहे. ट्रम्प म्हणाले की अमेरिकेविरुद्धच्या धोरणांवर जे देश सहमत होतील त्यांच्यावर अधिकचं 10 टक्के टॅरिफ लादलं जाईल आणि त्या देशांवर कठोर प्राहर केला जाईल. डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स समुहातील सहभागी देशांचं नाव न घेता इशारा दिला आहे. त्या देशांचा समुह मजबूत झाला तरी लवकर संपून जाईल असा इशारा दिला.
ट्रेंडिंग
ट्रम्प यांचा नाव न घेता इशारा
डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी व्हाइट हाऊसमध्ये एका कार्यक्रमात ब्रिक्स आर्थिक समुहासोबत जोडलेल्या देशांना इशारा दिला आहे. या देशांनी डॉलरवरील त्यांचं अवलंबित्व कमी केल्यास त्यांच्यावर 10 टक्के अतिरिक्त टॅरिफ लादलं जाईल, असा इशारा दिला. ट्रम्प म्हणाले ते डॉलरचं वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न करत होते, आम्ही असं होऊ देणार नाही. ट्रम्प यांनी ही प्रतिक्रिया क्रिप्टोकरन्सी कायद्याला मंजुरी दिल्यानंतर दिली आहे.
ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांनी ब्रिक्सची स्थापना केली आहे. यामध्ये आता मिस्त्र, इथियोपिया, इंडोनेशिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात हे देश देखील सहभागी झाले आहेत. या समुहात अमेरिकेच्या डॉलरवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी व्यापाराच्या करारात स्थानिक चलनांचा वापर करण्यासंदर्भात चर्चा सुरु होत्या, असा दावा होता.
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की माझ्या इशाऱ्यानंतर त्यांच्या पुढच्या बैठकीतील उपस्थिती कमी झाली, कारण त्यांना टॅरिफ नको होतं. ट्रम्प म्हणाले 1 ऑगस्ट पर्यंत कोणताही व्यापारी करार झाला नाही तर ते ब्रिक्स देशांसाठी नव्या टॅरिफ व्यवस्थांसंदर्भात सविस्तर माहिती देत अधिकृत पत्र पाठवणं महत्त्वाचं आहे.
ब्रिक्सचा संस्थापक देश असलेल्या भारतानं डी डॉलरायझेशच्या संकल्पनेपासून दूर राहणं पसंत कंल आहे. 17 जुलै रोजी विदेश मंत्रालयानं स्पष्ट केलं की ब्रिक्सनं सक्रियपणे अमेरिकेच्या डॉलरला कमजोर करण्याचा प्रयत्न केलेला नाही. विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं की सीमापार व्यवहार, ब्रिक्सनं स्थानिक चलनांवर चर्चा केली मात्र, डी डॉलरायझेशन अजेंड्यात नव्हतं, असं म्हटलं.
ब्रिक्स समुहानं देखील अमेरिकेच्या विरोधात असल्याच्या चर्चेला नाकारलं आहे. बहुपक्षीय राजनैतिक मंच म्हणून ब्रिक्सची स्थापना झाली आहे. जी 7 आणि जी 20 या सारख आंतरराष्ट्रीय मंच अंतर्गत मतभेद आणि ट्रम्प यांच्या अमेरिका प्रथम या अजेंड्याचा सामना करत आहेत. ब्राझीलनं देखील बिक्सच्या चलनाबाबतचा प्रस्ताव मागं ठेवण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स समूह अमेरिकेचा शत्रू समजून डॉलरला कमजोर करण्याचा आरोप केला अशला तरी पुरावा दिलेला नाही.